कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केन विल्यम्सन टी-20 मधून निवृत्त

06:25 AM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

Advertisement

न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यम्सनने क्रिकेटच्या टी-20 प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. 35 वर्षीय विल्यम्सनने आतापर्यंत 93 टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Advertisement

केन विल्यम्सनने क्रिकेटच्या या अतिजलद टी-20 प्रकारात 33 धावांच्या सरासरीने 2575 धावा जमविल्या असून त्यात 18 अर्धशतकांचा समावेश आहे. विल्यम्सननची टी-20 प्रकारातील 95 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-20 प्रकारात न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक धावा जमविणारा विल्यम्सन हा दुसरा खेळाडू आहे. 2011 साली विल्यम्सनने टी-20 प्रकारात आपले पदार्पण केले. त्यानंतर त्याने 75 सामन्यात न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे. आयसीसीच्या 2016 आणि 2022 साली झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विल्यम्सनने न्यूझीलंडला उपांत्य फेरीपर्यंत तर 2021 साली अंतिम फेरीपर्यंत नेले होते. न्यूझीलंडतर्फे क्रिकेटच्या विविध प्रकारात विल्यम्सन हा सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज आहे. आता 2 डिसेंबरपासून न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका न्यूझीलंडमध्ये खेळविली जाणार असून विल्यम्सन या मालिकेसाठी अधिक सराव करण्यावर भर देईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article