कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कमलेशचे घर बांधण्याचे स्वप्न अधुरेच राहिले..

04:53 PM May 28, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

गुहागर / प्रशांत चव्हाण :

Advertisement

मुळचा दापोली-बुरोंडी गावचा मात्र गुहागर तालुक्यातील अडूर-कोंडकारूळ येथे स्थिरावलेला कमलेश तानाजी धोपावकर (४५) हा तरुण लहापणापासूनच मच्छीमारी बोटीवर काम करत होता. पत्नी आणि दोन मुलांसह संसाराचा गाडा हाकणाऱ्या कमलेशला स्वतःचे घर बांधायचे होते. मात्र लोणावळ्यात पर्यटनाला गेलेल्या कमलेशचा मृतदेहच सोमवारी सायंकाळी गावात आला आणि अवघा गाव सुन्न झाला. किरकोळ वादातून झालेल्या खूनाने कमलेशचे घर बांधण्याचे स्वप्न मात्र अपुरेच राहिले.

Advertisement

करंजा बंदरात मच्छीमारी बोटीवर काम करत असताना यावर्षी समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मासेमारी ३० मे पूर्वीच बांबली. त्यामुळे बोटीच्या नाखवाने बोटीवरील सर्वांना सोबत कमलेश घोपायकर घेवून लोणावळ्यातील मच्छीमार समाजाचे कुलदैवत श्री एकविरा आईच्या दर्शनाला नेले होते. कमलेश आणि १६ जण लोणावळा येथे भाड्याच्या वाहनाने गेले. येथे एक फार्महाऊसमधील खोली त्यांनी घेतली. तेथे स्नान करून ते देवदर्शनाला गेले. सायंकाळी फार्महाऊसवरुन निघताना त्याच ठिकाणी रहायला आलेल्या ४-५ जणांजवळ गाडी वळवण्यावरून त्यांचा वाद झाला. हा वाद फार्महाऊसच्या मालकाने मिटवला. त्यानंतर कमलेश व सहकारी आपले वाहन घेवून तेथून बाहेर पडले. यानंतर अवघ्या १५ मिनिटात एक कार, एक रिक्षा व एका दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी आपल्या गाड्या आडव्या घालून कमलेश व सहकारी असलेले वाहन अडवले. वाहनाची चावी घेतली आणि कमलेश आणि सहकाऱ्यांना काठ्या व मारहाण करायला सुरुवात केली.

यात कमलेशला खूप मारहाण झाली. त्याच्या डोक्यावर वर्मी घाय बसला. कमलेशचा सहकारी मनोज वरवाटकरचा (बोटीचा तडिल) हात जायबंदी झाला. तर प्रज्वल मेहताच्या डोक्याला मार लागला. कमलेश गतप्राण झाल्याचे लक्षात येताच आलेल्या तरुणांनी तेथून पोबारा केला. कमलेश, मनोज आणि प्रज्वलला स्थानिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्यावर वाहने मोठ्या प्रमाणात असल्याने गतप्राण झालेल्या कमलेशला अक्षरशः उचलून घेवून धाव-पळल रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कमलेशला मृत घोषित केले. २६ मे रोजी त्यांच्या सहकाऱ्यांनी कमलेशचा मृतदेह कोंडकारुळ गावात आणला. शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हा मूळचा दापोली तालुक्यातील बुरोंडी गावचा. मात्र बालपणापासून मच्छीमारी बोटीवर काम करत असताना त्याची ओळख अडूर-कोंडकारूळ परिसरात निर्माण झाली व तो येथेच स्थिरावला. सरळ, साध्या स्वभावाचा असलेल्या कमलेशचा विवाह याच गावातील कृष्णा पावरी यांच्या मुलीशी झाला. त्याला एक मुलगा व मुलगी आहे. त्याचे कित्येक वर्षे येथे घर बांधण्याचे स्वान होते, मात्र ते त्याच्या आकस्मिक मृत्यूने अधुरे राहिले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article