सुवर्णकार नारायण शिरोडकर यांचे निधन
12:13 PM Dec 10, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी -
Advertisement
सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथील सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या दत्ताराम शिरोडकर (63 ) रा. माठेवाडा ,सावंतवाडी यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या अकाली निधनाने उभा बाजार येथील सुवर्ण व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. आज सायंकाळी उपरल स्मशानभूमीत यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी ,तीन बहिणी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. तेथील सुवर्णकार आणि भाजप पदाधिकारी संजू शिरोडकर यांचे ते बंधू होत.
Advertisement
Advertisement