महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कमलनाथांच्या निवासात पोलिसांकडून झाडाझडती

06:24 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप उमेदवाराच्या तक्रारीवरून पीएवर गुन्हा

Advertisement

वृत्तसंस्था/ .छिंदवाडा

Advertisement

छिंदवाड्यातील राजकीय पेच नव्या पातळीवर पोहोचला आहे. भाजप उमेदवाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घराची झाडाझडती घेतली. तसेच कमलनाथ यांचे पीए आर. के. मिगलानी आणि एका पत्रकाराविऊद्ध बनावट व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मिगलानी यांची चौकशी करण्यासाठी पोलीस शिकारपूर येथील कमलनाथ यांच्या बंगल्यावर पोहोचले होते.

छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार विवेक बंटी साहू यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पीए आर. के. मिगलानी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात सीएसपी अजय राणा यांच्या नेतृत्वाखाली आठ ते दहा वाहनांचा पोलीसताफा शिकारपूर येथील कमलनाथ यांच्या बंगल्यावर पोहोचला. ही माहिती मिळताच कमलनाथ समर्थकही बंगल्यावर जमा झाले. कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ छिंदवाडा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article