कल्याणीची कुस्ती स्पर्धेत चमक
10:42 AM Nov 14, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
किणये/वार्ताहर
Advertisement
वाघवडेची रहिवासी कल्याणी आंबोळकरने कर्नाटक सरकार शालेय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत 69 वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धा विजयनगर होस्पेट येथे दि. 8 व 9 रोजी झाल्या होत्या या स्पर्धेत कल्याणीने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कल्याणी ही एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिला कुस्ती प्रशिक्षक मारूती घाडी, उमेश बेळगुंदकर, शाळेचे क्रीडा शिक्षक कल्लाप्पा हगिदले, अनिल गोरे, मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी, सोमनाथ अंबोळकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Advertisement
Advertisement
Next Article