कराटेपटू कल्याणीला ब्लॅकबेल्ट प्रदान
बेळगाव : महांतेशनगर येथील महांत भवन, बेळगाव येथे कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण 55 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी होते. बेळगाव जिह्याचे मुख्य परीक्षक गजेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा झाली. कल्याणी ताशिलदार ही गेल्या चार वर्षांपासून महांतेशनगर येथील कराटे क्लासमध्ये सतत सराव करित होती. तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली. कठीण परिश्रमातून इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते कल्याणी ताशिलदार्र हिला ब्लॅकबेल्ट, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पालक महेश ताशिलदर आणि नंदा ताशिलदर यांचासुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तिचे प्रशिक्षक परशुराम काकती यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित मुख्य अतिथी म्हणून आनंद गुडस (सरचिटणीस, आर. बी. डी), लखन दादा जाधव (गुऊवर्य सव्यासाची गुऊकुलंम, कोल्हापूर), सिद्राय गुगरट्टी (आर्मी सुभेदार, मेजर), चंद्रशेखर मरिगौडर (आर्मी हवालदार), बाळासाहेब पसारे (आर्मी फिजिकल कमांडो ट्रेनर), जावेद तासेवाले (आर्मी ए.सी.पी हवालदार), दिगंबर पवार (चेअरमन मराठा बँक), विशाल ताशिलदर (बिझनेसमन बेळगाव), गजेंद्र काकतीकर तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर व प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, विजय सुतार, परशराम नेकनार, लक्ष्मण कुंभार, नताशा अष्टेकर, काव्या बडीगेर, सहील काकती, रितू चौगुले, पार्थ चौगुले, जयकुमार मिश्रा, विनायक दंडकर, संजीव गस्ती आणि कृष्णा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तेजस्विनी ओमकार तमुचे यांनी केले.