For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुने बेळगाव येथील कलमेश्वर यात्रा उत्साहात

10:44 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
जुने बेळगाव येथील कलमेश्वर यात्रा उत्साहात
Advertisement

बेळगाव : जुने बेळगाव येथील कलमेश्वर यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात झाली. सोमवारी रात्री वाजत गाजत आंबिल गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली.  मंगळवारी सायंकाळी कलमेश्वर मंदिरासमोर इंगळ्यांनी यात्रेची सांगता झाली. यामुळे जुने बेळगाव परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक पद्धतीने जुने बेळगाव येथील कलमेश्वर यात्रा झाली. सोमवारी रात्री 9 नंतर खन्नूकर गल्ली, गणेशपेठ, महादेवनगर, कोरवी गल्ली येथील आंबिल गाडे जुने बेळगाव परिसरात मिरवणुकीने काढण्यात आले. पहाटेपर्यंत उत्साही वातावरणात आंबिल गाडे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. गुलालाच्या उधळणीत युवावर्गाने मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर फेर धरला. मंगळवारी बस्ती गल्ली येथून पालखी काढण्यात आली. कलमेश्वर मंदिरापर्यंत पालखी आल्यानंतर गाऱ्हाणे घालण्यात आले. सायंकाळी 6 वा. कलमेश्वर मंदिरासमोर इंगळ्यांचा कार्यक्रम झाला. शेकडो भाविक यासाठी मंदिर परिसरात दाखल झाले होते. गावातील प्रमुख मानकरी व पंच मंडळींच्या उपस्थितीत यात्रोत्सव पार पडला.

Advertisement

Advertisement
Tags :

.