महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कलखांबच्या तरुणाचा युपीएससीमध्ये डंका

11:16 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राहुल पाटीलचा देशात 804 वा रँक, सातत्य-प्रयत्नांचे यश

Advertisement

बेळगाव : आपल्या मनात इच्छा असेल तर विद्यार्थी कोणतेही ध्येय पूर्ण करू शकतो. खडतर परिश्रम, सातत्य आणि नियोजन याच्या जोरावर कलखांब (ता. बेळगाव) येथील राहुल जयवंत पाटील या विद्यार्थ्याने युपीएससी परीक्षेमध्ये देशात 804 वा रँक मिळवून बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. ध्येय निश्चित करून अपयशानंतरही सातत्याने प्रयत्न करून यश गाठता येते, हे राहुलने दाखवून दिले आहे. कलखांब येथील शेतकरी कुटुंबातील राहुलने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेळगाव येथील वनिता विद्यालयामध्ये पूर्ण केले. आरएलएस महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेऊन बेंगळूर येथील आर. व्ही. महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. 2018 मध्ये पदवी शिक्षण घेऊन राहुलने नोकरी न स्वीकारता युपीएससी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने सातत्याने पाचवेळा युपीएससीची परीक्षा दिली. यामध्ये त्याला अपयश आले असले तरी जिद्द न सोडता पाचव्यावेळी यश गाठणे शक्य झाले आहे.

Advertisement

वडील शेतीसह मध्यम व्यवसाय करतात. आई घरकाम करते. भाऊ व्यावसायिक असून बहीण उच्चशिक्षित पदवीधर आहे. त्यांच्या प्रोत्साहन व पाठबळामुळे हे यश गाठणे शक्य झाले असल्याचे राहुलने सांगितले. सतत 14 ते 16 तास अभ्यास केल्याने हे यश गाठता आले आहे. अभियांत्रिकी पदवी घेतली असली तरी भूगोलशास्त्र हा आवडता विषय. शाळेपासूनच या विषयामध्ये आवड असल्याने युपीएससीसाठी हा विषय निवडला असल्याचे त्याने सांगितले. बेळगाव येथे काही दिवस अभ्यास केल्यानंतर युपीएससी परीक्षा देण्यासाठी दिल्ली हे योग्य ठिकाण असल्याचे समजल्याने दिल्ली येथे वर्षभरापासून वास्तव्यास राहून परीक्षा दिली. देशभरातील बहुतांश विद्यार्थी दिल्ली येथे अभ्यासाला येतात. त्यामुळे एकमेकाच्या संपर्कातून व मार्गदर्शनातून अभ्यास करणे अधिक सोयीचे होते. तसेच तेथील वातावरणही अशाच प्रकारच्या परीक्षा देण्यास पूरक असल्याने अधिक प्रोत्साहन मिळते. दिल्ली येथील विशिष्ठ भागामध्ये युपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकरिता स्टडी हॉल निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणीच अभ्यास करणारे सहकारी आयएएस झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून  व सहकार्यातून यश गाठण्यास अधिक प्रोत्साहन मिळाल्याचे राहुल याने सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article