For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कलाश्रीच्या बंपर सोडतीचे विजेते शंकर होरकेरी

11:14 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
कलाश्रीच्या बंपर सोडतीचे विजेते शंकर होरकेरी
Advertisement

बेळगाव : कलाश्री बंब आणि स्टील फर्निचर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या भव्य बक्षीस योजनेतील सातव्या बंपर सोडतीचे विजेते शंकर गंगाप्पा होरकेरी, वडगाव (बेळगाव) हे ठरले आहेत. त्यांना रु. 25,000 च्या खरेदी व्हाऊचरचे बक्षीस उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. या सोडतीचा ड्रॉ शनिवार दि. 20 रोजी कलाश्री बंब आणि स्टील फर्निचर, कलाश्री टॉवर, खानापूर रोड, उद्यमबाग येथे मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी अन्य चार विजेत्यांची सोडत पद्धतीने (ड्रॉ) निवड करण्यात आली. हे चार उपविजेते पुढीलप्रमाणे : 1) बाहुबली डी. कुडची, मजगाव, 2) लता प्रकाश कुगजी, येळ्ळूर, 3) धरती दिनेश गावडे, अनगोळ, 4) वैष्णवी भैरू बाळेकुंद्री, धामणे यांना इलेक्ट्रीक इस्त्री बक्षीस देण्यात आली.

Advertisement

दुपारी 4 ते 4.30 या वेळेत उपस्थित असलेल्या ग्राहकांना सोडत पद्धतीने निवड करून त्यांना कलाश्री बंबच्यावतीने आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. हे भाग्यवान विजेते पुढीलप्रमाणे- 1) अनिल धामणेकर, पिरनवाडी, 2) सिद्धाप्पा तुक्काणाचे, देवगणहट्टी, 3) मोहन भुजबाळ, सुरूते, 4) नारायण कोवाडकर, हिंडलगा. या सर्व विजेत्यांना प्रमुख अतिथी रोटरी क्लब बेळगाव मिडटाऊनचे अध्यक्ष रोटे. नागेश मोरे, व्ही. आर. आमले पेट्रोलियमचे मालक रोहिदास आमले, रोटे. पुष्पा पर्वतराव, आयुर्वेदिक सल्लागार राकेश पाटील, कामाक्षी प्रकाश पाटील, कलाश्री बंबचे संचालक प्रकाश डोळेकर आदींच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तत्पूर्वी उपस्थित ग्राहक, सभासद आणि उपस्थित सर्वांना रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊन आणि कलाश्री बंब यांच्या सहकार्याने डेंग्यूविषयी जनजागृती करण्यात आली. सूत्रसंचालन श्रीधर पाटील यांनी केले.

कलाश्रीतर्फे खास सवलत 

Advertisement

दरम्यान, कलाश्रीच्या होलसेल शोरूममध्ये शनिवारी सर्वांसाठी साखर, जवारी मसूर व अन्य वस्तू सवलतीच्या दरात देण्यात आल्या.

कलाश्रीची सामाजिक बांधिलकी

कलाश्रीने विविध सामाजिक उपक्रम राबविले असून त्याचा अनेकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये नेत्रतपासणी शिबिर, मोतिबिंदू ऑपरेशन, मोफत आरोग्य तपासणी, डेंग्यू लस असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कलाश्रीने कलाश्री को-ऑप. सोसायटीची स्थापना केली असून ग्राहकांसाठी 5 वर्षे 9 महिन्यात दामदुप्पट योजना सुरू केली आहे. त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सोसायटीचे चेअरमन प्रकाश डोळेकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.