For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कलाश्री ग्रुपतर्फे उत्कृष्ट कामगिरीबद्दल डीलर्सचा सन्मान सोहळा उत्साहात

10:48 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
कलाश्री ग्रुपतर्फे उत्कृष्ट कामगिरीबद्दल डीलर्सचा सन्मान सोहळा उत्साहात
Advertisement

9600 रुपयांमध्ये ग्राहकांना कार जिंकण्याची संधी : कलाश्री ग्रुपने विश्वासार्हता निर्माण केल्यामुळेच सर्वच योजनांना चांगला प्रतिसाद

Advertisement

बेळगाव : येथील कलाश्री  बंब अँड स्टील फर्निचर उद्योग समूहा तर्फे सुरू असलेल्या चौथ्या ग्राहक बक्षीस योजने दरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या डीलर्सचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रम उद्यमबाग येथील कलाश्री टॉवर मधील सभागृहात झाला. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर येथील कार्पोरेट ट्रेनर सागर शेळके, कलाश्री ग्रुपचे चेअरमन प्रकाश डोळेकर, कलाश्री सोसायटीच्या संचालिका रश्मीता यादव यांच्यासह अन्य मान्यवर होते. यावेळी कोल्हापूर येथील कार्पोरेट ट्रेनर सागर शेळके  यांनी डीलर्सना मार्गदर्शन केले.

सागर शेळके म्हणाले, या जगात कोणत्याही व्यवसायात अशक्य अशी गोष्ट नाही. फक्त जिद्द आणि वेळेचे नियोजन करून प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. येथील कलाश्री ग्रुपच्या माध्यमातून विविध ग्राहक बक्षीस योजना आहेत. यातून अनेक शेकडो तरुणांना रोजगार मिळत आहे. याकडे बेळगाव शहरातील तरुणांनी गांभीर्याने लक्ष देऊन या योजनेच्या कामात सहभागी झाला तर अनेक जणांना पार्ट टाइम जॉब मिळण्याची संधी आहे. कलाश्री ग्रुपने विश्वासाहर्ता निर्माण केल्यामुळेच सर्वच योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यांमध्ये कलाश्री ग्रुप ने आपले नाव अधोरेखित केले आहे.

Advertisement

यावेळी  बेळगाव खानापूर चंदगड सह अन्य तालुक्यातून 250 हून अधिक कलाश्री ग्रुपचे डीलर्स उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रुपचे चेअरमन प्रकाश डोळेकर यांनी केले. ते म्हणाले ग्राहकांच्या उदंड प्रतिसादानंतर चौथी योजना ही यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. या योजनेत अजूनही ग्राहकांना एकाच हप्त्यात 9600 रुपये एकदाच भरून या योजनेतील कार किंवा दोन लाख ऊपयांचे बक्षीस मिळवण्याची संधी आहे. यासाठी डीलर्सकडून अधिक माहिती घेऊन अधिकाधिक संख्येने संख्येने ग्राहकानी सहभागी व्हावे.

याशिवाय जे बक्षिसाचे मानकरी होत नाहीत, अशांना 11 हजार ऊपयांचे येथील विविध फर्निचर तसेच अन्य साहित्य वस्तू खरेदी करण्याची संधी आहे. कलाश्रीच्या चौथ्या भव्य बक्षीस योजनेचे एकदाच 9600 चे अधिकाधिक ग्राहक नोंदणी केल्याबद्दल बक्षीस योजनेच्या डीलर्स कामाक्षी पाटील, भरमा नाईक ( होसूर, चंदगड) यांना कलाश्री को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालिका रश्मीता रवळनाथ यादव यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच यावेळी वेळेत उपस्थित राहिलेल्या डीलर्स पैकी सोडत काढून बक्षीस देण्यात आले. यामध्ये डीलर्स कोमल शिरवाडकर (बेळगाव), सुरेखा कन्नूर ( खादरवाडी ), एस. पी. खानोलकर (बेळगाव) यांची निवड करून त्यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कलाश्री ग्रुपच्या संचालिका सुकन्या डोळेकर यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.