कलंबिस्त -शिरशिंगे रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर
मंत्री दीपक केसरकर यांचा पाठपुरावा ;
सावंतवाडी प्रतिनिधी
सह्याद्री पट्ट्यातील अत्यंत धोकादायक असलेली वळणे आणि कमी अंतराचे रस्ते ,अत्यंत रुंद करण्याच्या दृष्टीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विशेष प्रयत्न करून धवडकी ते कलंबिस्त -शिरशिंगे हा दहा किलोमीटरचा रस्ता रुंद करण्याच्या करण्याच्या दृष्टीने कार्यवाही हाती घेतली . पहिल्या टप्प्यात धवडकी ते सांगेली असा अडीच किमीचा जवळपास दोन कोटी रुपये अर्थसंकल्पातून मंजूर करून हा रस्ता आता अरुंद करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कित्येक वर्ष या मार्गावरून धावणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वेडी वाकडी वळणे पार करत प्रवास करण्याची वेळ आली होती. मात्र आता हा मार्ग राज्यमार्ग होणार आहे. भविष्यात हा मार्ग मुंबई- गोवा हायवेच्या धरतीवर सह्याद्री महामार्ग म्हणून प्रस्तावित आहे. हा मार्ग साडेतीन फूट मार्ग असलेला आता लवकरच साडे पाच फूट लांबीचा येत्या महिन्याभरात पूर्ण होणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सह्याद्री पट्ट्यातील गावे आणि तेथील रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने आपण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे असे स्पष्ट केले आहे. धवडकी ते कलंबिस्त असा मार्ग आता अरुंद होण्याच्या टप्प्यात आला आहे. पहिल्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंबोली -बेळगाव मुख्य मार्गांपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर सह्याद्री पट्ट्यातील सैनिकी गाव असलेल्या कलंबिस्त पंचक्रोशीतील रस्ते विकसित व्हावेत ,अरुंद रस्ते आहेत ते रुंद करण्याच्या दृष्टीने आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विशेष प्रयत्न करून अर्थसंकल्पातून जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यात अडीच किमी अंतराचा मार्ग रुंद मंजूर केला आहे. दुसऱ्या टप्प्यात सांगेली ते कलंबिस्त असा जवळपास तीन ते साडेतीन किमीचा रस्ता रुंद करण्यात येणार आहे . त्यानंतर कलंबिस्त ते शिरशिंगे गोठवेवाडी शिवापूर असा मार्ग रुंद करण्यात येणार आहे. या मार्गावर गेल्या कित्येक वर्षापासून सांगेली जायपिवाडा येथे वळण आहे. अपघाताला हे वळण निमंत्रण ठरत होते . मात्र केसरकर यांच्यामुळे रस्ता रुंदीकरण प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या भागातील जनतेला अपेक्षा होती. ती केसरकर यांच्यामुळे मार्गी लागल्याची भावना या भागाचे शिवसेना पक्षाचे जीवन लाड व संजय पालकर यांनी स्पष्ट केले. केसरकर यांच्यामुळेच या पंचक्रोशीत विकास कामे झपाट्याने सुरू आहेत . आंबोली - बेळगाव मार्ग दुरुस्तीच्या केसरकर यांनी सूचना केल्या आहेत . आता हा मार्ग रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात मार्चनंतर पुढील रस्ता रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत साडेतीन फूट असलेला मार्ग आता साडेपाच फूट म्हणजे दोन फुट ने रुंद होणार आहे. त्यामुळे वाहन चालक तसेच नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे . सदर रस्त्याचे दोन फूटाने रुंदीकरण ,डांबरीकरण करण्यात येणार आहे . त्यासाठी जवळपास दोन कोटी रुपये मंजूर झाल्याचे अभियंता विजय चव्हाण यांनी स्पष्ट केले.