For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

कळंबा गावाला सुसज्ज मैदान उपलब्ध करणार! आमदार ऋतुराज पाटील यांची ग्वाही

03:00 PM Mar 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
कळंबा गावाला सुसज्ज मैदान उपलब्ध करणार  आमदार ऋतुराज पाटील यांची ग्वाही
MLA Rituraj Patil

"शौर्य स्पोर्ट्स" आमदार चषकाचा मानकरी; स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

कळंबा वार्ताहर

कळंबा गावात क्रेकेट शौकिनांची संख्या जास्त आहे नुकत्याच पार पडलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत पाहता खेळाडूंसाठी हे मैदान अपुरे पडत असल्याने खेळाडूंवर खेळताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे कळंब्यातील क्रिकेट प्रेमींसाठी सुसज्ज असे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

Advertisement

कळंबा येथे आमदार चषक गावमर्यादित हाप पिच नाईट क्रिकेट स्पर्धा झाल्या. हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ व विकास पोवार - बावडेकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत शौर्य स्पोर्ट्स यांनी विजेतेपद पटकावले. तर स्वराज्य बॉईज यांनी उपविजेतेपद मिळविले तर तृतीय शांती सेना तरुण मंडळ यांनी पटकावला. गेले आठवडाभर सुरू असलेल्या सामन्यांची बुधवारी चषकाची अंतिम सामने खेळवण्यात आले. यावेळी सुरवातीला आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते टॉस करून सामन्याची सुरवात राष्ट्रगीत म्हणून स्पर्धेचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील, माजी उपसरपंच माजी सरपंच विश्वास गुरव, दिलीप टिपूगडे, उदय जाधव,अरुण टोपकर, संदीप पाटील, रोहित मिरजे, संदीप पाटील, रोहित जगताप, योगेश रोपळकर, स्वरूप पाटील, उत्तम जाधव, रोहित जगताप, भगवान पाटील, सुहास जंगम, चंद्रकांत पोवार बावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गावमर्यादित क्रेकेट स्पर्धेत हिंदवी क्रीडांगणावर झालेल्या तुल्यबळ स्पर्धेत दोन्ही संघा कडून फटके बाजी करण्यात आली या वेळी स्वराज बॉईज यांना अंतिम सामन्यात शौर्य स्पोर्ट्स ने चांगली गोलंदाजी करत पाच षटकात 28 धावा रोखले. त्यानंतर शौर्य स्पोर्टने चांगली फलंदाजी करत चार शटकात सामन्यावर आपले नाव कोरले शौर्य स्पोर्ट संघातील प्रेम साळोखे, मालिकवीर ठरला गावमर्यादित हाप पिच नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये 22 संघांनी सहभाग नोंदवला होता गाव पातळीवर होणाऱ्या स्पर्धा व खेळाडूंना प्रोत्साहन देऊन क्रिकेट प्रेमींनी ही आनंद लुटला तसेच स्पर्धेकरीता माजी उपसरपंच विकास पोवार - बावडेकर यांच्याकडून रोख 7000 ग्रामपंचायत सदस्य संदिप पाटील यांच्या कडून -5000 माजी सरपंच विश्वास गुरव यांच्या कडून-3000 सर्वे चषक ग्रामपंचायत सदस्य सोनल शिंदे व धर्मेंद्र गौड यांच्या कडून देण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामपंचायत सदस्य, क्रिकेट प्रेमी व ग्रामस्थ उपस्तीत होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.