For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सिकंदर’मध्ये झळकणार काजल

06:06 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘सिकंदर’मध्ये झळकणार काजल
Advertisement

सलमान खानचा बिगबजेट चित्रपट

Advertisement

काजल अग्रवालने 2004 साली ‘क्यों हो गया ना...’ या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या जगतात पाऊल ठेवले होते. त्यानंतर ती दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली होती. अजय देवगणच्या ‘सिंघम’ चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. स्पेशल 26, मुंबई सागा समवेत अनेक चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आता ती सलमान खानसोबत दिसून येणार आहे. सिकंदर या चित्रपटात ती रश्मिका मंदानासोबत नायिका म्हणून झळकणार आहे.

काजल अग्रवाल आता साजिद नाडियाडवालाचा चित्रपट सिकंदरमध्ये दिसून येणार आहे. एआर मुरुगादॉस यांच्याकडून दिग्दर्शित होणाऱ्या या चित्रपटात रश्मिका मंदाना ही मुख्य नायिका असणार आहे. काजल अग्रवालची या चित्रपटातील भूमिका कुठल्या स्वरुपाची असणार हे अद्याप समोर आलेले नाही.

Advertisement

या चित्रपटात दाक्षिणात्य कलाकार सत्यराज देखील असणार आहे. त्यांनी बाहुबली चित्रपटात कटप्पा ही भूमिका साकारली होती. तर प्रतीक बब्बर या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे.

काजल अग्रवाल ही कमल हासन यांच्या  इंडियन 3 चित्रपटाचाही हिस्सा आहे. याचबरोबर उमा या हिंदी चित्रपटात ती काम करत आहे. एका तेलगू चित्रपटात ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

Advertisement
Tags :

.