For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काजल अग्रवालचे ‘सत्यभामा’द्वारे पुनरागमन

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
काजल अग्रवालचे ‘सत्यभामा’द्वारे पुनरागमन
Advertisement

काजल अग्रवाल दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसून आलेली नाही. परंतु अभिनेत्री आगामी अॅक्शन चित्रपट ‘सत्यभामा’द्वारे पुनरागमन करणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे. या चित्रपटात काजल एक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तेलगू चित्रपटात काजल ही सत्यभामा नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तिने सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे. यात ती फ्यूरियस फाइटरच्या भूमिकेत दिसून आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन  अखिल डेगाला यांच्याकडून करण्यात आले आहे. तर याला श्री चरण पकाला यांच्याकडून संगती लाभले आहे. या चित्रपटाची निर्मिती ऑरम आर्ट्स बॅनर अंतर्गत बॉबी टिक्का आणि श्रीनिवास राव टक्कलपेल्ली यांच्याकडून करण्यात आली आहे. हा चित्रपट चालू महिन्यात प्रदर्शित होणार आहे. काजल अग्रवालचा हा 60 वा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटात काजलसोबत नवीन चंद्रा, प्रकाश राज, नागिनेदु, हर्षवर्धन, रवि वर्मा, अंकित कोय्या, संपदा एन. प्रज्वल यादमा, नेहा पठाण, अनिरुद्ध पवित्रन, सत्या प्रदीप्ति आणि रोहित सत्यन यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.