पंजाबमध्ये कबड्डीपटूची गोळी झाडून हत्या
लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/ लुधियाना
पंजाबमध्ये कबड्डीपटूंवर होणारे हल्ले सातत्याने वाढत आहे. लुधियाना जिल्ह्यातील मांकी गावात मंगळवारी रात्री उशिरा कबड्डीपटू गुरविंदर सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 4 हल्लेखोर दुचाकींवरून आले होते आणि त्यांनी गुरविंदर तसेच त्यांच्या मित्रांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला होता.
गोळीबारत गुरविंदर आणि धर्मवीर गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही रुग्णालयात हलविण्यात आले, तेथे गुरविंदरचा मृत्यू झाला, तर धर्मवीरवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. टोळीच्या हरि बॉक्सर आणि आरजू बिश्नोई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी 31 ऑक्टोबर रोजी लुधियानामध्ये कब•ाrपटू तेजपालची हत्या करण्यात आली होती. कब•ाrपटूंच्या हत्येमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. आरोपींची ओळख पटवून लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.