महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ऑलिम्पिक प्रवेशासाठी कबड्डीने भारताबाहेर पाय रोवण्याची गरज

06:36 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तमिळ थलायवास’चे मुख्य प्रशिक्षक अशन कुमार यांनी व्यक्त केलेले मत

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

कबड्डीला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणे अशक्य नाही, परंतु त्यासाठी या खेळाने भारताबाहेर मजबूतपणे पाय रोवण्याची गरज आहे, असे मत ‘तमिळ थलायवास’चे मुख्य प्रशिक्षक अशन कुमार यांनी व्यक्त केले आहे. कुमार यांना वाटते की, प्रो कबड्डी लीग (पीकेएल) यासारख्या उपक्रमांनी देशातील खेळाची स्थिती सुधारली आहे, परंतु जागतिक स्तरावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी आणखी काही पावले उचलणे आवश्यक आहे.

‘जोपर्यंत तुम्ही देशाबाहेर खेळाला प्रोत्साहन देणार नाही तोपर्यंत तो कधीही वाढणार नाही. आशियाई खेळांमध्ये कबड्डीचा समावेश झाल्यानंतर आम्हाला नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि इतर अनेक देशांमध्ये हा खेळ शिकवण्याची संधी मिळाली’, असे कुमार यांनी येथे ‘पीकेएल’च्या पार्श्वभूमीवर एका विशेष संवादादरम्यान सांगितले.

जर या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करायचा असेल, तर इतर राष्ट्रांमध्येही तो विकसित करावा लागेल. परदेशी लोक आमच्या युक्त्या शिकत असल्याने ‘पीकेएल’ आमच्यासाठी त्रासदायक आहे असा विचार करणे अत्यंत मूर्खपणाचे आहे. आपण त्याचा प्रचार करत राहायला हवे आणि आपला खेळ सुधारण्याचे काम करत राहिले पाहिजे. कब•ाr ही सध्या केवळ आशियाई खेळांपुरती मर्यादित आहे, जिथे आम्ही बहुतांश स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेते राहिलेलो आहोत. ‘पीकेएल’ने या खेळाच्या संवर्धनासाठी निश्चितच मदत केलेली आहे, असे कुमार यांनी सांगितले.

त्यांच्या या मतांना पाठबळ देताना ‘थलायवास’चे सीईओ शुशेन वसिष्ठ म्हणाले की, वर्चस्व चांगले दिसते खरे, परंतु कोणत्याही खेळासाठी ते कधीही निरोगी लक्षण नसते. आम्हाला स्पर्धा हवी आहे. परदेशी खेळाडू ‘पीकेएल’च्या माध्यमातून खरोखरच आमच्या युक्त्या शिकत आहेत, परंतु त्याचबरोबर हा खेळ परदेशात अधिक लोकप्रिय होत आहे या बाबीकडे आपण सकारात्मकदृष्ट्या पाहिले पाहिजे. इतर संघ देखील हा खेळ शिकू पाहत असल्यामुळे आम्ही आमचा खेळ सुधारण्याची गरज आहे. आपण ही त्यादृष्टीने संधी मानली पाहिजे. तळागाळातून अधिकाधिक खेळाडू निर्माण होतील याची काळजी घ्यावी लागेल, असे ते पुढे म्हणाले.

 

Advertisement
Tags :
# tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article