For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

के. आर. शेट्टी रायगड, एसआरएस हिंदुस्थान, नील बॉईज विजयी

09:59 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
के  आर  शेट्टी रायगड  एसआरएस हिंदुस्थान  नील बॉईज विजयी
Advertisement

साईराज चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित 9 व्या साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळवण्यात आलेला सामन्यात के. आर. शेट्टी रायगड, नील बॉईज, एसआरएस हिंदुस्थान अनगोळ संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सोमसिंग, जयसिंग पाटील, अमित पाटील, विकी मोहन, अमोल निलगुडे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सीन डेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी रायगड संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 77 धावा केल्या. त्यात राकेश कहरने 26, तर सागरने 19 धावा केल्या. स्टार रेल्वेतर्फे फैजलने दोन गडी बाद केले. दाखल खेळताना स्टार रेल्वे संघाने 8 षटकात 7 गडी बाद 39 धावा केल्या. त्यात तबरेजने 19 धावा केल्या. रायगडतर्फे सोमसिंगने चार गडी बाद केले. बेळगाव वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 32 धावा केल्या. एसआरएस हिंदुस्थानतर्फे अवधूतने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस हिंदुस्थान संघाने 2.2 षटकात एक गडी बाद 35 धावा करून सामना नऊ गड्यांनी जिंकला. त्यात जयसिंग पाटीलने 28 धावा केल्या.

एवायएम अनगोळने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 76 धावा केल्या. त्यात अकिबने 4 षटकारासह 43, तर इजामामने 13 धावा केल्या. नील बॉईजतर्फे जावेद व रोहित यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नील बॉईजने 5.5 षटकात 4 गडी बाद 78 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात अमितने 50 तर विवेकने 22 धावा केल्या. चौथ्या सामन्यात यमकनमर्डी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 80 धावा केल्या. त्यात ओझरने 37 तर चैतन्यने 17 धावा केल्या. के. आर. शेट्टी रायगडतर्फे वृषभने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी रायगड संघ 6.4 षटकात 7 गडी बाद 90 धावा करून सामना तीन गड्यांनी जिंकला. त्यात राकेशने 26 तर सागर आणि विकी यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. यमकनमर्डीतर्फे शोएबने तीन गडी बाद केले. पाचव्या सामन्यात कांतारा बॉईजने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 5 गडी बाद 49 धावा केल्या. त्यात अजयने 25 धावा केल्या. एसआरएस हिंदुस्थानतर्फे अमोल निलगुडेने तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस हिंदुस्थानने 3.3 षटकात बिनबाद 50 धावा करून सामना दहा गड्यांनी जिंकला. त्यात जयसिंग पाटीलने नाबाद 32 तर अमोलन निलगुडेने नाबाद 15 धावा केल्या.

Advertisement

शुक्रवारचे सामने

1) आप्पा इलेव्हन विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स हलगा स. 9 वा. 2) बेळगावची नारायणी विरुद्ध मोहन मोरे स. 10 वा. 3) राहुल के. आर. शेट्टी विरुद्ध एसआरएस हिंदुस्थान स.11 वा. 4) पहिल्या सामन्यातील विजेता विरुद्ध माऊली स्पोर्ट्स देसूर दुपारी 12 वाजता

Advertisement
Tags :

.