कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

के.आर.शेट्टी मंगाई,एवायसी संघ विजयी

10:29 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

साईराज चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात डेपो मास्टर्सने एचएमडी स्पोर्ट्सचा, के. आर. शेट्टी मंगाई स्पोर्ट्सने माऊली स्पोर्ट्स देसूरचा, एवायसीने शक्ती बॅटरीजचा तर के. आर. शेट्टी मंगाई इलेव्हनने साईराज बी. चा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. विशाल गौरगौंडा, संतोष सुळगे पाटील, परशुराम, इंजमाम नाईकवाडी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात डेपो मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 88 धावा केल्या.

Advertisement

हरिशने 4 षटकारासह नाबाद 41 धावा केल्या. एचएमडीतर्फे मुस्ताकने 3 गडी बाद केले. त्यानंतर एचएमडी संघाचा डाव 5.5 षटकात 33 धावात आटोपला.  मुजोमिलने 12 तर आयनने 10 धावा केल्या. डेपो मास्टर्सतर्फे विशाल गौरगौंडाने 4 धावात 6 तर स्वयंम अप्पण्णवरने 2 गडी बाद केले.  दुसऱ्या सामन्यात के. आर. शेट्टी मंगाईने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 114 धावा केल्या. त्यात संतोष सुळगे पाटीलने 5 षटकार व 4 चौकारासह नाबाद 57, जावेदने 2 चौकार, 2 षटकारसह नाबाद 26 धावा केल्या. माऊलीतर्फे प्रशांत व आदर्श यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर माऊली संघाचा डाव 7 षटकात 22 धावात आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.

के. आर. शेट्टीतर्फे अवधूत व संतोष सुळगे पाटील यांनी प्रत्येकी 4 धावात 3 तर विकीने 2 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात एवायसी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात सर्वगडी बाद 78 धावा केल्या. त्यात परशुरामने 2 षटकार, 2 चौकारांसह 24 तर मलिकजानने 12 धावा केल्या. शक्तीतर्फे सदानंदने 8 धावात 4 तर राहुलने 17 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर शक्तीने 8 षटकात 8 गडी बाद 54 धावा केल्या. त्यात शुभमने 2 षटकारास 20 धावा केल्या. एवायसीतर्फे अब्बासने 11 धावात 3 तर विनोदने 2 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात के. आर. शेट्टी मंगाई संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 87 धावा केल्या. इंजमामने 5 षटकार व 1 चौकारांसह नाबाद 40 तर संदीप मकवानाने 2 षटकार 2 चौकारांसह 21 धावा केल्या. साईराजतर्फे विजयने 3 तर रोशन आणि गुरु यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर साईराज ब ने 8 षटकात 7 गडी बाद 48 धावा केल्या.

बुधवारचे सामने

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article