महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

के.आर. शेट्टी लायाज, एसडीएम संघ विजयी

10:13 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केएससीए 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए 16 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एसडीएम ए. संघाने हुबळी क्रिकेट अकादमीचा 6 गड्यांनी केआरसीटी लायाज संघाने रॉजर क्रिकेट क्लबचा 154 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. शुभम खोत, राहुलदेव सिंग यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए ऑटोनगर बेळगाव येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात के. आर. शेट्टी लायाज संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.4 षटकात 9 गडी बाद 240 धावा केल्या. त्यात शुभम खोतने 12 चौकारासह 72, सिध्दार्थ बागलकोटने चार चौकारासह 33, आर्य शेट्टीने 3 चौकारासह 33, आनंद जाधव व रणजीत कांबळे यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. रॉजर क्रिकेट क्लबतर्फे श्रेयश पाटीलने 43 धावांत 4 तर पवन व नमन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरा दाखल खेळताना रॉजर क्रिकेट क्लबचा डाव 24.2 षटकात 71 धावांत आटोपला. त्यात प्रसन्न हणगंदने 27 तर अवनिशने 10 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे सिध्दार्थने 10 धावा 3, आर्य शेट्टीने 18 धावांत 3 तर रणजीत, अजित व श्रेयश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.

Advertisement

हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी क्रिकेट अकादमी अ ने प्रथम फलंदाजी करताना 40 षटकात सर्व गडी बाद 118 धावा केल्या. त्यात हरषितने 4 चौकारासह 24 तर सिध्दार्थने 10 धावा केल्या. एसडीएमसीए धारवाड संघातर्फे नवाजने 22 धावांत 3, जेसनने 37 धावांत 2 तर अभिनंदनने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना 7 षटकात 2 गडी बाद 57 धावा केल्या असता पावसाने हजेरी लावल्याने उत्तम धावसंख्येच्या जोरावर एसडीएम धारवाड संघाने 8 गड्यांनी विजय मिळविला. राहुलदेव सिंगने 1 षटकार, 8 चौकारासह 39 धावा तर श्लोक माळीने 10 धावा केल्या. हुबळीतर्फे रमेश व कार्तिकने प्रत्येकी 1 गडी बाद केला. हुबळी येथील रेल्वे मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात तानाजी स्पोर्ट क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 36.5 षटकात सर्व गडी बाद 146 धावा केल्या. तर व्यंकटेशने 1 षटकार 2 चौकारासह 41, वैभवने 14, स्वयंमने 10 धावा केल्या. हुबळी स्पोर्टस् क्लब सीतर्फे प्रितम, हमित, विनायक यांनी प्रत्येकी दोन तर मंजुनाथ, प्रज्वल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्टस् सी संघाने 3 षटकात 1 गडी बाद 11 धावा केल्या असता पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबविण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article