महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हुबळी अकादमीकडे के. आर. शेट्टी चषक

10:11 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संकेत शेट्टी मालिकावीर, आर. एस. पवन सामनावीर

Advertisement

बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित के. रत्नाकर शेट्टी चषक 16 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हुबळी क्रिकेट अकादमीने बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा 3 गड्यांनी पराभव करून के. रत्नाकर शेट्टी चषक पटकाविला. मालिकावीर संकेत शेट्टी तर सामानावीर आर. एस. पवन यांना गौरविण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 22.1 षटकात सर्व गडी बाद 104 धावा केल्या. त्यात निल पवारने 5 चौकारासह 35, अर्णव कुंदपने 2 चौकारासह 15, तनिष्क जैनने 13, सुरेंद्र पाटीलने 10 धावा केल्या. हुबळी क्रिकेट अकादमीने संकेत शेट्टी 13 धावात 3, युनसने 19 धावात 3, विकास पाटीलने 20 धावात 2 तर अक्षयने 1 गडीबाद केला.

Advertisement

प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमीने 24.2 षटकात 7 गडीबाद 105 धावा करून सामना 3 गड्यांनी जिंकला. त्यात आर. एस. पवनने 7 चौकारासह 47, संकेत शेट्टीने 4 चौकारासह 20 धावा केल्या. बेळगाव स्पोर्टस क्लबतर्फे निल पवार व सोहम पाटील यानी 12 धावात प्रत्येकी 2 गडी तर सुरेंद्र पाटीलने 21 धावात 2 गडीबाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे हरिश शेट्टी पुरस्कृर्ते, प्रणय शेट्टी, शिरीश गोगटे, अविनाश पोतदार, प्रशांत कुंदप, दीपक पवार, बाळकृष्ण पवार, समीर केशकामत, संगम पाटील, राजु दळवी, विजय पाटील, सोमनाथ सोमण्णाचे यांच्याहस्ते विजेत्या हुबळी क्रिकेट अकादमी उपविजेत्या बेळगाव स्पोर्टस क्लब यांना चषक, प्रमाणपत्र व पदके देऊन गौरविण्यात आली. अंतिम सामन्यातील सामनावीर आर. एस. पवन हुबळी, उत्कृष्ट फलंदाज निल पवार बी. एससी, उत्कृष्ट गोलंदाज विकास पाटील हुबळी, उत्कृष्ट यष्टीरक्षक आशितोष हिरेमठ बीएससी, मालीकावीर संकेत शेट्टी हुबळी यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article