महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

के.पी.साहेब तुमच्या काळातील फक्त 10 विकासकामे सांगा, मगच मते मागा

12:58 PM Nov 07, 2024 IST | Radhika Patil
K.P. Saheb, mention only 10 development works of your time, only then ask for votes
Advertisement

आमदार प्रकाश आबिटकर : तुरंबे येथे आमदार आबिटकर यांचा भव्य प्रचार शुभारंभ, सभेला अभुतपुर्व गर्दी

Advertisement

कोल्हापूर  :
के.पी.साहेब आपल्या आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात केलेली फक्त 10 विकास कामे सांगा आणि मगच मते मागायला या, असे जाहीर आव्हान आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले. ते तुरंबे (ता.राधानगरी) येथे प्रचार शुभारंभ प्रसंगी विराट बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडीक होते. तर प्रमुख उपस्थितीत गोकुळ संचालक अरुणकुमार डोंगळे, आण्णाभाऊ उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक आण्णा चराटी, जेष्ठनेते के.जी.नांदेकर, प्रा.जालिंदर पाटील उपस्थित होते. या सभेला अभुतपुर्व गर्दी झाली होती.

Advertisement

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, तुमच्या निक्रियतेमुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला सलग दोन वेळा जनतेने निवडून दिले. लोकांच्या मनातील असलेल्या विकासाच्या कल्पना सत्यात उतरण्यासाठी अहोरात्र झटतोय. पण आपण 10 वर्षाच्या काळात केलेली 10 विकासकामे आठवून सांगा अन्यथा आपणास मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. राधानगरी मतदार संघातील जनता अनेकवर्ष विकासापासून दूर होती. गेल्या 10 वर्षात अनेक विकासकामे मार्गी लावली आहे. अजून अनेक कामे पूर्ण करावयाची असून भविष्यात राज्यातील प्रगत मतदारसंघ म्हणून राधानगरीची ओळख निर्माण करण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन आम.आबिटकर यांनी केले.

खासदार धनंजय महाडीक म्हणाले की, राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात कधी नव्हे इतका प्रचंड विकास झालेला आहे. दुसरीकडे मात्र लबाडीचे राजकारण करून लोकांना फसविण्याचा उद्योग सुरू आहे. विस्ताराने प्रचंड मोठा असलेल्या या मतदार संघातील 350 हून अधिक गावांचा परिपुर्ण विकास साधण्याचे काम आमदार आबिटकर यांच्या माध्यमातून झालेले आहे. चाळीस वर्षात पाण्याच्या कलशाचे का पुजन झाले नाही असा ही त्यांनी सवाल यावेळी उपस्थित केला. आमदार आबिटकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाकडे आमदार म्हणून परिचीत आहेत. त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. म्हणूनच राधानगरी मतदार संघात रस्ते, आरोग्य, पाणी, विज, लघु प्रकल्प यासारखे रखडलेल्या प्रश्नांसाठी केवळ 2 वर्षाच्या कालावधीत हजारो कोटी रुपयांचा निधी आणणारा जिह्यातील एकमेव आमदार म्हणून आमदार आबिटकर यांचा उल्लेख करावा लागेल. मतदार संघाच्या विकासासाठी सर्वस्व पणाला लाऊन काम करण्राया माणसाला राधानगरी मतदार संघातील जनता एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आण्णाभाऊ उद्योग समुहाचे अशोक चराटी म्हणाले, दुर्गम समजला जाणारा आजरा तालुका आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे प्रगत बनू लागला आहे. वाड्या-वस्यांवर विकास कामे पोहचली आहेत. त्यामुळे आजरा तालुक्यातील जनता आमदार आबिटकर यांना मोठं मताधिक्य देऊन विजयी करतील.

प्रा.जालिंदर पाटील म्हणाले की, शेतक्रयांना आणि बहीणींच्या चेह्रयावर हसू फुलवायचे काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिष्य आमदार प्रकाश आबिटकर यांना मतदार विजयी करून राधानगरीचा बाजीगर वाजत-गाजत विधानसभेमध्ये पाठवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरपीआय राज्य सरचिटणीस प्रा.शहाजी कांबळे म्हणाले, लोकसभेला संविधान बदलणार असे फेक नरेटीव्ह पसरवून दलीत समाजाची दिशाभूल केली असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे विधानसभेला दलित समाज अशा खोट्या भूलथापांना बळी पडणार नसून विकासाचे आयडॉल असण्राया आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय दलित समाजाने घेतला आहे.

यावेळी सह्याद्री साखर कारखाना चेअरमन बाळासाहेब नवणे, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, नंदकिशोर सुर्यवंशी-सरकार, दत्तात्रय उगले, अरुणराव जाधव, कल्याणराव निकम, सुर्याजीराव देसाई, मदनदादा देसाई, निवासराव देसाई, विलास रणदिवे, तानाजीराव चौगले, वंदनाताई जाधव, प्रविणसिंह सावंत, रविश पाटील-कौलवकर, अभिषेक डोंगळे, डॉ.सुभाष जाधव, रंगराव मगदूम, संभाजीराव आरडे, संदीप मगदूम, गोविंदराव चौगले, जी.डी.पाटील, व्ही.टी.जाधव सर, रंगराव पाटील, अॅड.प्रशांत भावके, दिपक शेट्टी, संग्रामसिंह पाटील, संग्रामसिंह कडव, विजयराव बलुगडे, दौलतराव जाधव, विजय महाडीक, चंद्रशेखर पाटील, मानसिंग पाटील, संदीप वरंडेकर, सुभाष चौगले, विलास पाटील, विलास नाईक, दशरथ अमृते, विजयसिंह पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत विजय बलुगडे यांनी केले तर आभार अशोकराव फराकटे यांनी मानले.

के.पी.ढोंगी व विश्वासघातकी
माजी आमदार के.पी.पाटील नेमक्या कोणत्या पक्षात हे पहिल्यांदा बघावे लागेल कारण के.पी.साहेब रात्री झोपायला एका पक्षात आणि सकाळी चुळ भरायला दुस्रया पक्षात जातात. त्यांनी निष्ठेचे तत्वाज्ञान आम्हाला शिकवू नये. माजी आमदार हरिभाऊ कडव, माजी आमदार नामदेवराव भोईटे, बिद्रीचे माजी चेअरमन हिंदुराव बळवंत पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव यांना फसवणारे के.पी.साहेबत हे ढोंगी व विश्वासघातकी असल्याचा टोला आमदार प्रकाश आबिटकर यांनी लगावला.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article