For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीआरएस नेत्या के. कवितांना धक्का

06:26 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
बीआरएस नेत्या के  कवितांना धक्का
Advertisement

दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने के. कविता यांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळला. सीबीआय आणि ईडी प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेल्या त्यांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. के. कविता यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने सोमवारी निकाल दिला. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती शर्मा यांनी 28 मे रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. सुनावणीदरम्यान, सीबीआय आणि ईडीने बीआरएस नेत्याच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. कविता यांनी घोटाळ्यामागील कटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या प्रभावशाली असल्यामुळे जामिनावर बाहेर असताना पुरावे आणि साक्षीदारांवर दडपण आणू शकतात, असे ईडीने आपल्या युक्तिवादात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.