जोतिबाची चैत्र यात्रा, कॉलरा अन् ख्रिश्चन अॅडिंग
कोल्हापूर / सौरभ मुजुमदार :
काही वर्षांपूर्वी देशभर कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले होते. सर्वच सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव, सण, समारंभास बंदी होती. ज्यामध्ये दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या यात्रेचाही समावेश होता. असेच संकट यापूर्वी एकदा 15 मार्च 1897 रोजी प्लेगच्या साथीमुळे चैत्र यात्रेवर आले होते. ज्यावेळी यात्रेला भाविकांना डोंगरावर जाण्यासाठी पूर्णपणे बंदी होती. यापूर्वी देखील असेच कॉलराच्या साथीचे संकट 27 मार्च 1869 रोजीच्या चैत्र-यात्रेवर आले होते. परंतु त्यावर्षीची यात्रा मात्र श्री केदारनाथांच्या साक्षीने सुरळीतपणे पार पडली होती. कारण त्यासाठी एक ब्रिटिश अधिकारी, ऑनररी असिस्टंट सर्जन, ख्रिश्चन अॅडींग यांनी अथक परीश्रम घेतले होते. कालांतराने ज्याला स्वत:चा जीव यामध्ये गमवावा लागला, अशी महत्वपूर्ण माहिती ब्रिटिशकालीन कोल्हापूरचा अभ्यास करणारे अभियंता भारत म्हारुगडे यांनी ‘तरुण भारत संवाद’ला दिली.
- 27 मार्च 1869 ची चैत्र यात्रा
सर्वत्र कॉलराने थैमान घातलेले असताना देखील 27 मार्च 1869 च्या चैत्र यात्रेसाठी कोल्हापूर दरबार व रेसिडेन्सीच्या लष्करी प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून यात्रेदरम्यान साथ रोग प्रतिबंधासाठी औषध तयार करून देणारा तज्ञ असा एक अधिकारी जोतिबा देवाच्या डोंगरावर पाठवलेला होता. त्या दिवशी तेथील व्यवस्था त्याने इतकी चोख ठेवली होती, की एवढ्या मोठ्या यात्रेच्या दरम्यान कॉलराची फक्त एकच केस नोंदवली गेली होती. तो अधिकारी म्हणजेच ख्रिश्चन अॅडिंग होय.
- ख्रिश्चन अॅडिंग व कोल्हापूरकरांचे अतूट नाते
करवीर संस्थानच्या छत्रपती घराण्याच्या योग्य समन्वयाने ब्रिटिश सत्तेचा अंमल असूनही चैत्र यात्रेसारखी मोठी यात्रा सुरळीत पार पडली होती, हेच यावरून दिसून येते. मे जून 1869 ला कोल्हापूर आणि दक्षिण मराठा संस्थानात सिव्हील इंजिनिअरिंगच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून पहिलाच पूल पंचगंगा नदीवर (शहराच्या सध्याच्या प्रवेशद्वारा शेजारील नुकताच पाडण्यात आला तोच ऐतिहासिक पूल) बांधण्यात येत होता. त्याचवेळी कोल्हापूर, सांगली, मिरज परिसरात कॉलराची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. या पुलाच्या बांधकामासाठी असणारे बरेच मजूरही यातून सुटले नाहीत. दोनच वर्षांपूर्वी 1867 ला Aज्दूपम्arब् (औषध तयार करणारी व्यक्ती) म्हणून आलेली ख्रिश्चन अॅडिंग ही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने मानद असिस्टंट सर्जनपदापर्यंत पोहोचली होती. परंतु कोल्हापुरात पसरलेल्या कॉलरा साथीवेळी अहोरात्र सेवा देता-देता अखेर कॉलराने त्यांनाही गाठलेच. व ते मृत्युमुखी पडले. कोल्हापुरातच आपल्या कुटुंबासमवेत राहणारा अॅडिंग आपली सेवा बजावताना कुटुंबालाच पोरका करून निघून गेला.
- डॉ. अँडिंग यांची स्मृती कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राने चिरंतन ठेवावी
भारत म्हारुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ या चैत्र यात्रेतील ख्रिश्चन अॅडिंग याचे कार्य संशोधन करून थांबले नाहीत तर कोल्हापूरच्या जनतेने व युरोपियन नागरिकांनी त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ कृतज्ञतापूर्वक उभा केलेला कित्येक वर्षे झाडाझुडपात दडलेला शहरातीलच तत्कालीन त्याचाच कबर स्वरूपातील दगडी स्तंभ शोधून काढला. परंतु त्यांचे एकही छायाचित्र सध्या उपलब्ध झालेले नाही. हजारो लोकांची चैत्र यात्रा मोठ्या कौशल्याने हाताळून कॉलरासारख्या रोगातून सुरक्षितपणे भाविकांना दख्खनच्या राजाचे दर्शन देणारा ख्रिश्चन अॅडिंग मात्र याच कोल्हापूरच्या भूमीत मरण पावला. तत्कालीन कोल्हापूरकरांचे त्याच्याशी असणारे ऋणानुबंध मात्र आज यानिमित्ताने उजेडात आले.
अवघ्या दोन वर्षांच्या कोल्हापुरातील कार्यकाळात डॉ. ख्रिश्चन अँडिंग यांनी आरोग्यविषयक क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती. जोतिबा यात्रेतील उत्तम व्यवस्थेनंतरच त्यांची Aज्दूपम्arब् पदावरून प्दहदब् एल्rgादह पदावर बढती झाली. दुर्दैवाने कोल्हापुरातील नागरिकांवर उपचार करताना ते स्वत: कॉलराने मृत्युमुखी पडले. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलांची अक्षरश: वाताहत झाली. कोल्हापूरच्या मातीत एकरूप झालेल्या डॉ. अँडिंग यांची स्मृती कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राने चिरंतन ठेवावी.
भारत म्हारूगडे, अभियंता, ब्रिटिशकालीन कोल्हापूर अभ्यासक