For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेदरलँड्समधील स्पर्धेत ज्योती याराजीला हर्डल्सचे सुवर्ण

06:44 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेदरलँड्समधील स्पर्धेत ज्योती याराजीला हर्डल्सचे सुवर्ण
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रीय विक्रमधारक 100 मी. हर्डल्स धावपटू ज्योती याराजीने नेदरलँड्समधील वुट्स येथील हॅरी शल्टिंग क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या मोसमात पहिल्या आऊटडोअर स्पर्धेत तिने हे यश मिळविले.

24 वर्षीय ज्योती याराजीने हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. नेदरलँड्समधील स्पर्धेत तिने 12.87 सेकंदात शर्यत पूर्ण करून सुवर्ण मिळविले. कारकिर्दीतील तिची ही चौथी सर्वोत्तम वेळ आहे. वर्ल्ड अॅथलेटिक्सची ही कॅटेगरी ई मधील स्पर्धा आहे. 2.77 सेकंद ही ऑलिम्पिकसाठी पात्रतेची वेळ असून ही वेळ तिने नोंदवली नसली तरी जागतिक मानांकनाच्या आधारावर ज्योती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या मार्गावर आहे. वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या क्रमवारीत ज्योती सध्या 26 व्या स्थानावर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 40 महिला धावपटू 10 मी. हर्डल्समध्ये सहभागी होणार आहेत. त्यापैकी 25 जणींना प्रवेश स्टँडर्डनुसार तर 15 जणींना जागतिक मानांकनानुसार प्रवेश मिळणार आहे. याराजीने 12.78 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम असून वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये गेल्या वर्षी नोंदवला होता. गेल्या फेब्रुवारीत तेहरान येथे झालेल्या आशियाई इनडोअर चॅम्पियनशिप्समध्ये तिने 60 मी. हर्डल्समध्येही सुवर्णपदक पटकावले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.