For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्योती होसट्टीचे जलतरणमध्ये यश

10:37 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
ज्योती होसट्टीचे जलतरणमध्ये यश
Advertisement

3 सुवर्ण, 3 रौप्यपदकांची कमाई

Advertisement

बेळगाव : आंध्रप्रदेशमधील गुंटूर येथे झालेल्या मेहबूब शमशेर खान यांच्या स्मरणार्थ 7 व्या राष्ट्रीय मास्टर अॅक्वेटीक जलतरण स्पर्धेत बेळगावच्या सरकारी वैद्यकीय अधिकारी ज्योती होसट्टीने 3 सुवर्ण, 3 रौप्यपदकास घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बेळगावच्या ज्योती होसट्टीने 25 व 50 मी. बॅकस्टोक, 50 मी. फ्रीस्टाईलमध्ये एकूण तीन सुवर्ण तर 25 मी. बटरफ्लॉय 4×100 फ्रीस्टाईल रिले व 4×100 मी. मिडले स्पर्धेत एकूण तीन रौप्यपदके पटकाविली. मान्यवरांच्या हस्ते तिला पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्योती होसट्टीने महिलांच्या 45 ते 49 वर्षे वयोगटात महिलांच्या विभागात भाग घेतला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.