For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायमूर्ती खानविलकर होणार नवे ‘लोकपाल’?

06:04 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्यायमूर्ती खानविलकर होणार नवे ‘लोकपाल’
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (निवृत्त) अजय माणिकराव खानविलकर यांची नवे लोकपाल म्हणून निवड निश्चित मानली जात आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) एरातु एस. राजीव यांची दक्षता आयुक्तपदी निवड होऊ शकते. या दोन्ही निवडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

न्यायमूर्ती प्रदीपकुमार मोहंती सध्या लोकपालचे कार्यवाह अध्यक्ष आहेत. आता तेथे न्यायमूर्ती खानविलकर यांची नियुक्ती अंतिम मानली जात आहे. न्यायमूर्ती खानविलकर हे एप्रिल 2002 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश झाले होते. त्यांनी काही काळ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर नोव्हेंबर 2013 मध्ये ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयात गेले. मे 2016 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती. तेथून त्यांनी जुलै 2022 पर्यंत म्हणजेच सेवानिवृत्तीपर्यंत सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता.

Advertisement

निवड समितीच्या सदस्यांपैकी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी एरातू एस. राजीव यांच्या निवडीबाबत असमाधान व्यक्त केले होते. त्यांनी या पदासाठी बँक ऑफ इंडियाचे माजी एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अतनु दास यांचे नाव सुचवले होते. तथापि, लोकपाल पदासाठी काँग्रेसने निवृत्त न्यायाधीश खानविलकर यांच्या नावाला विरोध केला नसल्याचेही समजते.

Advertisement
Tags :

.