For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसलाच दिले घराचे स्वरुप

06:02 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसलाच दिले घराचे स्वरुप
Advertisement

किचनपासून टॉयलेटपर्यंतची सुविधा

Advertisement

महागाईच्या या काळात कुणासाठी भाड्याच्या घरात राहणे अत्यंत खर्चिक ठरले आहे. अशा स्थितीत घर खरेदी करणे अशक्यच ठरले आहे. याचमुळे आता देशविदेशात लोक साधे जीवन जगू इच्छितात आणि कमीत कमी सुविधांचा अवलंब करत आहेत. कॅनडातील एक दांपत्याने देखील हा फॉर्म्युला स्वीकारला आहे. हे दांपत्य आता एका बसमध्ये राहते. परंतु बसमध्ये राहणे देखील आव्हानात्मक असते. या दांपत्याने बसमध्ये राहणे किती चांगले आहे आणि  कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे सांगितले आहे.

मँडी आणि तिचे पती रिटोमी हे दोघेही 32 वर्षांचे आहेत. ते मूळचे जपानचे आहेत, परंतु आता कॅनडात स्थायिक झाले आहेत. दोघेही स्वत:चा पाळीव श्वान ऑस्करसोबत एका बसमध्ये राहतात. त्यांना या बसमध्ये राहून 3 वर्षे झाली आहेत. महामारीच्या  काळात दोघांचीही नोकरी गेली होती. तेव्हा ते ज्या ठिकाणी राहत होते, त्याचे घरभाडे 1.8 लाख रुपयापर्यंत होते.

Advertisement

घरभाडे टाळण्यासाठी त्यांनी एक जुनी स्कूलबस खरेदी केली आणि त्यात स्वत:च्या सुविधेनुसार बदल केले. या बसचे रुपडं पालटण्यासाठी त्यांना सुमारे 2 वर्षे लागली. परंतु यात ते आता तीन वर्षांपासून राहत आहेत. या बसकरता त्यांना 15 लाख रुपये खर्च आला आहे. बसमध्ये त्यांनी बेडपासून टॉयलेटपर्यंत, किचनपासून सोलर पॅनेलपर्यंत सुविधा निर्माण केली आहे. दांपत्याने यापूर्वीच कधी नुतनीकरणाचे काम केले नव्हते. परंतु स्वत:च्या बसच्या बहुतांश गोष्टी त्यांनीच डिझाइन केल्या आहेत. याकरता त्यांनी मित्र आणि कुटुंबीयांचीही मदत घेतली. त्यांचा एक नातेवाईक इलेक्ट्रिशियन होता, त्याने बसचे वायरिंग केले. बसमध्ये सर्व गरजा पूर्ण होतात, केवळ स्नानाची समस्या आहे, कारण कॅनडात खूप थंडी असते आणि यामुळे त्यांना बसवर पाण्याची टाकी बसविता आली नाही. थंडीमुळे पाणी गोठू शकते. याचमुळे ते जंगली भागात बसबाहेर उभे राहून स्नान करतात.

बसमध्ये अनेक वर्षे वास्तव्य केल्यावर या दांपत्याने आता ही बस विकण्याचा विचार चालविला आहे. आता ते छोटी गाडी खरेदी करत त्यात वास्तव्य करणार आहेत. अनेक पर्यटनस्थळी बस पार्क करणे अवघड असते. अशास्थितीत त्यांनी आता एक व्हॅन विकत घेतली आहे. जी बऱ्याचअंशी पूर्वीच रेनोवेट करण्यात आली होती. स्वत:ची बस ते 40 लाख रुपयांमध्ये विकत आहेत.

Advertisement
Tags :

.