कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत अ च्या डावात जुरेलचे नाबाद शतक

06:00 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/बेंगळूर

Advertisement

ध्रुव जुरेलच्या नाबाद शतकाच्या जोरावर गुरूवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात यजमान भारत अ ने द. आफ्रिका अ संघाविरुद्ध पहिल्या डावात 255 धावा जमविल्या. जुरेलने 175 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारांसह नाबाद 132 धावांची खेळी केली. द. आफ्रिका अ संघाच्या व्हुरेनने 52 धावांत 4 गडी बाद केले. द. आफ्रिका अ संघाने नाणेफेक जिंकून भारत  अ संघाला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिका अ संघाच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर भारताचा निम्मा संघ 86 धावांत तंबूत परतला. सलामीच्या केएल राहुलने 3 चौकारांसह 19 धावा केल्या. अभिमन्यू ईश्वरनला खाते उघडता आले नाही. साई सुदर्शनने 3 चौकारांसह 17 तर देवदत्त पडिकलने 5 धावा जमविल्या. कर्णधार ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

पंतने 20 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24 धावा केल्या. हर्ष दुबेने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. कुलदीप यादवने 1 चौकारांसह 20 तर मोहम्मद शिराजने 3 चौकारांसह 15 धावा केल्या. कुलदीप यादव आणि जुरेल यांनी आठव्या गड्यासाठी 79 धावांची भागिदारी केल्याने भारत अ संघाला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात भारत अ ने 24 षटकात 4 बाद 85 धावा जमविल्या होत्या. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रात भारताने चहापानावेळी 47 षटकात 7 बाद 156 धावांपर्यंत मजल मारली होती. या सत्रामध्ये भारत अ संघाने 3 गडी गमविताना 71 धावा जमविल्या. जुरेलने आपले अर्धशतक 62 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने झळकविले. चहापानानंतर जुरेलने आपले शतक 145 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. द. आफ्रिका अ संघातर्फे व्हुरेनने 52 धावांत 4 तर मोर्कीने 52 धावांत 2 तसेच सुब्रायनने 73 धावांत 2 गडी बाद केले. सिलेने 1 बळी मिळविला. या मालिकेतील पहिला सामना भारत अ संघाने जिंकून यापूर्वीच आघाडी मिळविली आहे.

संक्षिप्त धावफलक : भारत अ प. डाव 77.1 षटकात सर्वबाद 255 (ध्रुव जुरेल नाबाद 132, कुलदीप यादव 20, पंत 24, राहुल 19, सुदर्शन 17, दुबे 14, मोहम्मद सिराज 15, अवांतर 9, व्हुरेन 4-52, मोर्की 2-52, सुब्रायन 2-73, सिले 1-57).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article