पहिल्या कसोटीत नितीशऐवजी जुरेलला संधी
वृत्तसंस्था/ कोलकाता
यष्टीरक्षक ध्रुव जुरेल दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या पहिल्या कसोटीत खेळेल आणि अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी rची जागा तो घेईल, असे भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशाटे यांनी बुधवारी सांगितले.
आतापर्यंत सात कसोटी सामने खेळलेल्या 24 वर्षीय जुरेलने गेल्या पाच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये चार शतके झळकावली आहेत, ज्यात गेल्या आठवड्यात बेंगळूरमध्ये दक्षिण आफ्रिका ’अ’ संघाविऊद्ध झळकावलेली दोन शतके समाविष्ट आहेत. जुलैमध्ये मँचेस्टरमध्ये इंग्लंडविऊद्धच्या चौथ्या कसोटीत झालेल्या पायाच्या फ्रॅक्चरमधून बरे झाल्यानंतर पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक रिषभ पंत संघात परतला आहे. त्यामुळे व्यवस्थापनाला जुरेलसाठी जागा मिळेल का याबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते.
परंतु टेन डोइशाटे म्हणाले की, शुक्रवारपासून ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी संघाच्या रचनेबद्दल त्यांचे आराखडे स्पष्ट आहेत. मला वाटते की, आम्हाला संघरचना कशी असावी याबद्दल चांगली कल्पना आहे आणि मला वाटत नाही की, तुम्ही त्यांना (जुरेल आणि पंत) या कसोटीत बाहेर ठेवू शकता, हेच त्याचे छोटे उत्तर आहे, असे डोइशाटे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ाांगितले. जर या आठवड्यात ध्रुव आणि रिषभ या कसोटीत खेळताना दिसले नाहीत, तर मला खूप आश्चर्य वाटेल, असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दीड वर्ष पूर्ण झालेल्या जुरेलने त्याच्या अनुभवाच्या तुलनेत जास्त संयम आणि परिपक्वता दाखवली आहे. यंदा सप्टेंबरच्या मध्यापासून पाच सामन्यांमध्ये (रणजी, कसोटी आणि ’अ’ सामन्यांसह) 140, 56, 125, 44, नाबाद 132 आणि नाबाद 127 धावा त्याने केलेल्या असून त्याचा प्रथम श्रेणीचा फॉर्म उल्लेखनीय आहे. त्याची प्रथम श्रेणीची सरासरी 47.34 वरून 58 पर्यंत वाढली आहे, ज्यामुळे त्याला दुर्लक्षित करणे अशक्य झाले आहे.
‘ध्रुव गेल्या सहा महिन्यांत ज्या पद्धतीने खेळला आहे आणि गेल्या आठवड्यात बेंगळूरमध्ये ज्या प्रकारे दोन शतके झळकावली आहेत ते पाहता तो या आठवड्यात खेळेल हे निश्चित आहे’, असे टेन डोइशाटे म्हणाले. जुरेल शुद्ध फलंदाज म्हणून खेळेल आणि पंत यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळेल अशी अटकळ यापूर्वी व्यक्त झाली होती. डोइशाटे यांनी पुष्टी केली की, नितीश रे•ाrला वगळले जाईल. रे•ाrला वगळण्याबद्दल विचारले असता नेदरलँड्सचा हा माजी क्रिकेटपटू म्हणाला, ‘वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत नितीश दोन्ही कसोटी सामने खेळला आणि आम्ही त्याला भविष्यासाठी तयार करणे महत्त्वाचे आहे. आम्ही त्याच्याकडे शिकण्यासाठी खेळणारा आणि क्षमता असलेल्या खेळाडू या नजरेने पाहतो’.
पण मी असेही म्हटले आहे की, रणनीती प्रथम येते. प्राथमिक गोष्ट म्हणजे सामना जिंकण्यासाठी रणनीती आखणे. जर तुम्ही खेळाडूंना विकासाची संधी देण्यास अनुकूल असाल, तर ते योग्य ठरेल. नीतीशबद्दलची आमची भूमिका निश्चितच बदललेली नाही. त्याला ऑस्ट्रेलियामध्ये जास्त वेळ मिळाला नाही. परंतु या मालिकेचे महत्त्व आणि आम्हाला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे असे आम्हाला वाटते ते पाहता तो (नीतीशकुमार रेड्डी r) या आठवड्यातील या कसोटीला मुकू शकतो, असे टेन डोइशाटे पुढे म्हणाले.
या साहाय्यक प्रशिक्षकाने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंमुळे खालच्या व मधल्या फळीत भारताची वाढलेली खोली आणि लवचिकता देखील अधोरेखित केली. ‘मी वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्याबद्दल जे सांगितले होते त्याप्रमाणे आमच्याकडे त्यांच्या रुपाने प्रत्यक्षात तीन फलंदाज आहेत. त्यामुळे यामुळे आम्हाला खूप लवचिकता मिळते’, असे ते म्हणाले, अक्षर पटेल कुलदीप यादवच्या जागी संघात परतू शकतो असा संकेत त्यांनी दिले. मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू असलेल्या नितीशकुमारने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत माफक कामगिरी केली होती, ज्यामध्ये भारताने 2-0 असा विजय मिळवला होता. त्याने पहिल्या कसोटीत फक्त चार षटके गोलंदाजी केली होती आणि एकही बळी मिळाला नव्हता, तर एका डावात त्याने 43 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेत त्याने नाबाद 19 आणि दोन सामन्यात 8 धावा केल्या.