कनिष्ठ महिलांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था/काकिनाडा
हॉकी इंडियाच्या 15 व्या कनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेला येथे शुक्रवारपासून प्रारंभ होत असून या स्पर्धेत एकूण 30 संघांचा समावेश आहे. सदर स्पर्धा नव्याने अंमलात आणलेल्या विभागीय फॉर्मेटनुसार खेळविली जाईल. सदर स्पर्धा 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे 30 संघ अ, ब, क अशा तीन गटात विभागण्यात आले आहेत. अ आणि ब गटातील शेवटच्या स्थानावर असलेल्या दोन संघांना अनुक्रमे ब आणि क गटात पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी पदोन्नतीची संधी दिली जाणार आहे. त्याच प्रमाणे ब आणि क गटातील आघाडीच्या दोन संघांना अ आणि ब गटामध्ये बढती दिली जाईल. अ विभागात एकूण 12 संघांचा समावेश आहे. विद्यमान विजेता झारखंड अ गटात, गेल्या वर्षीचा उपविजेता मध्यप्रदेश ब गटात तर हरियाणा क गटात आहे.
विभाग गट अ :
गट अ : - झारखंड, छत्तीसगड, कर्नाटक
गट ब : मध्यप्रदेश, पंजाब, चंदीगड, गट क: हरियाणा, उत्तरप्रदेश, बंगाल, गट ड : ओडिशा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश.
विभाग ब
गट अ : मणिपूर, पुडुचेरी, उत्तराखंड, केरळ, आसाम, गट ब : हिमाचल प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश व बिहार.
विभाग क
गट अ : दादरा-नगर हवेली व दमन-दिव, जम्मू-काश्मिर, गोवा, त्रिपुरा, गट ब : गुजरात, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा.