कनिष्ठ महिला हॉकी संघ जाहीर
कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेसाठी ज्योती सिंगकडे नेतृत्व
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिलीतील सांतियागो येथे होणाऱ्या महिलांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी 20 सदस्यीय भारतीय महिला संघ जाहीर झाला असून या संघाचे नेतृत्व ज्योती सिंगकडे सोपविण्यात आले आहे.
या स्पर्धेत भारताचा पहिला सामना नामिबियाविरुद्ध 1 डिंसेबर रोजी तर दुसरा सामना जर्मनीविरुद्ध 3 डिंसेबर व तिसरा सामना आयर्लंडविरुद्ध 5 डिंसेबर रोजी खेळविण्यात येणार आहे. जर्मनी, आयर्लंड आणि नामिबियासह भारताला गट ‘क’ मध्ये स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा 1 ते 13 डिंसेबर दरम्यान खेळवली जाणार आहे. भारतीय संघ 1 डिसेंबर रोजी नामिबिया विरुद्ध पहिली मोहीम सुरु करेल. प्रत्येक गटातील अव्वल संघ बाद फेरीत प्रवेश करतील. बाद फेरीचे सामने 7 ते 13 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला कनिष्ठा महिला संघ : गोलरक्षक-निधी, एंजिल हर्षा राणी मिंझ, डिफेंडर्स -मनीषा, लालथनलुआलंगी, साक्षी शुक्ला, पूजा साहू, नंदिनी, मिडफिल्डर्स-साक्षी राणा, इशिका, सुनेलिता टोप्पो, ज्योती सिंग, खैदेम शिलेमा चानू, बिनिमा धान. फॉरवर्ड्स-सोनम, पूर्णिमा यादव कनिका सिवाच, हिना बानो, सुखवीर कौर. पर्यायी खेळाडू -प्रियांका यादव, पार्वती टोपनो.