For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कनिष्ठ पुरूष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून

06:00 AM Aug 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
कनिष्ठ पुरूष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

जालंदर येथे मंगळवारपासून नव्या फॉर्मेटमध्ये 15 व्या हॉकी इंडियाच्या कनिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 30 संघांचा समावेश आहे. हॉकी इंडियाने यापूर्वीच वरिष्ट आणि उपकनिष्ठांच्या पुरुष व महिलांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत नव्या फॉर्मेटची अंमलबजावणी केली होती. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणारे 30 संघ तीन विभागामध्ये विभागण्यात येतील. गट अ, गट ब आणि गट क असे तीन गट करण्यात आले आहेत. या स्पर्धेत पदोन्नती आणि पदावनत्ती यांचा समावेश राहील. अ गटातील संघांमध्ये जेतेपदासाठी लढत होईल तर ब आणि क गटातील आघाडीच्या दोन संघांना पुढील  वर्षांसाठी पदोन्नती मिळेल तर अ आणि ब गटातील शेवटच्या दोन संघांची पुढील वर्षी होणाऱ्या 2026 च्या स्पर्धेसाठी पदावनत्ती होईल. गट क मधील सामने 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान स्पर्धेतील सामने खेळविले जातील. ही स्पर्धा साखळी पद्धतीने होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.