कनिष्ठ भारतीय हॉकी संघ जाहीर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ओमान मस्कत येथे 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पुरुषांच्या कनिष्ट आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने सोमवारी 20 हॉकीपटूंची घोषणा केली. या स्पर्धेसाठी भारतीय कनिष्ट हॉकी संघाचे नेतृत्व अमिर अलीकडे सोपविण्यात आले आहे.
भारतीय कनिष्ट हॉकी संघाने आतापर्यंत कनिष्टांचा आशियाई चषक हॉकी स्पर्धा 2004, 2008, 2015 आणि 2023 अशा विक्रमी चारवेळा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव करुन जेतेपद मिळविले होते. मस्कतमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 10 संघांचा समावेश असून ते दोन गटात विभागण्यात आले आहेत. अ गटात भारत, चीन तैपेई, जपान, कोरिया, थायलंड तर ब गटात बांगलादेश, मलेशिया, चीन, ओमान आणि पाक यांचा समावेश आहे. भारतीय कनिष्ट हॉकी संघाला पी. आर. श्रीजेशचे मार्गदर्शन लाभत आहे.
भारतीय कनिष्ट हॉकी संघ: गोलरक्षक- प्रिंसदीप सिंग, विक्रमजित सिंग, बचावफळी-अमिर अली (कर्णधार), पी. तालेम, शारदानंद तिवारी, योगेंबर, रावत, अनमोल एक्का, रोहीत (उपकर्णधार), मध्यफळी- अंकित पाल, मनमीत सिंग, रोशन कुजुर, मुकेश टोप्पो, टी. किंग्सन सिंग, आघाडीफळी-गुरुज्योत सिंग, सौरभ खुशावह, दिलराज सिंग, अर्षदीप सिंग आणि अरजित सिंग हुंडाल.