रोहित शर्माच्या घरी ज्युनियर हिटमॅनचे आगमन
12:35 PM Nov 16, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि पत्नी रितिका यांना मुलगा झाला आहे. रोहित आणि रितिका दोघेही दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत. याआधी त्यांना समायरा नावाची मुलगी असून ती आता सहा वर्षांची झाली आहे. ज्युनियर हिटमॅनच्या आगमनानंतर रोहितचे चाहते त्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनंदन करत आहे. एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये एका लहान बाळाचा दोघांनी हात पकडलेला दिसत आहे. अद्याप रोहित आणि रितिका दोघांनी अजून जाहीरपणे आनंदाची बातमी सांगितलेली नाही.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article