For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाळेल येथे २ लाख १६ हजारांची दारू पकडली

02:15 PM Nov 16, 2024 IST | अनुजा कुडतरकर
गाळेल येथे २ लाख १६ हजारांची दारू पकडली
Advertisement

चालक फरार, इन्सुली एक्साईजची कारवाई

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर विरोधात इन्सुली एक्साईज विभागाने गाळेल येथे शुक्रवारी रात्री कारवाई केली. कार तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करूनही चालक कार (एमएच ०२ पीए ४३९४) सुसाट घेऊन पळाला. एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी त्या कारचा पाठलाग करून कार अडविली. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन कार चालक जंगलातून पळून जाण्यात यशस्वी झाला. या कारवाईत २ लाख १६ हजार ७२० रुपयांची दारू व दोन लाख रुपयांची अल्टो कार असा एकूण ४ लाख १६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, गाळेल येथून गोवा बनावटीची दारू वातूक होणार असल्याची गोपनीय माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती. त्यानुसार गाळेल येथे सापळा रचण्यात आला होता. गोव्यातून येणारी अल्टो कार थांबवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, चालकाने कार न थांबवितात तशीच सुसाट सोडली. एक्साईज विभागाने कारचा पाठलाग करून जिल्हा परिषद शाळेकडे कार अडवली. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चालक जंगलातून पळून गेला. एक्साइजच्या कर्मचाऱ्यांनी सदर कार व कार मधील मुद्देमाल जप्त केला.सदर कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत.

Advertisement
Tags :

.