गृहलक्ष्मी योजनेची जून, जुलैची रक्कम लवकरच खात्यावर
06:23 AM Jul 10, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
Advertisement
प्रतिनिधी/ बेंगळूर
Advertisement
गृहलक्ष्मी योजनेतील जून आणि जुलै या दोन्ही महिन्याच्या हप्त्याची रक्कम एकाचवेळी लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. जून महिन्यातील गृहलक्ष्मी योजनेच्या हप्त्याची रक्कम अद्याप जमा करण्यात आली नसल्याने टीका केली जात आहे. याविषयी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ट्विटवर माहिती दिली असून लवकरच जून आणि जुलै महिन्यातील हप्त्याची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे जून महिन्यात गृहलक्ष्मी योजनेतील रक्कम जमा करण्यात आली नव्हती. थोडा विलंब झाला असला तरी 15 जुलैपूर्वी रक्कम जमा करण्यात येणार आहे.
Advertisement
Next Article