जुनैद खान अन् खुशी कपूर यांच्या 'लव्हयापा'
सिनेमाची रिलीज डेट आली समोर
मुंबई
बॉलीवूडमध्ये स्टारकीडचे प्रोजेक्ट्स हे नेहमीच चर्चेत असतात. अशातच बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवी बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर या दोघांचा 'लव्हयापा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
जुनैद ने 'महाराज' या सिनेमातून नुकतेच बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. जुनैदच्या या सिनेमातील अभिनयाचे खूप कौतुक केल गेलं. तर खुशीने 'द आर्चीस' या बहुचर्चित चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. 'लव्हयापा' ही जुनैद आणि खुशी या दोघांची थिएटरल डेब्यू फिल्म आहे. अद्वैत चंदन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमा नववर्षात ७ फेब्रुवारी ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दरम्यान चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झालेली आहे. फॅंटम स्टुडीओ आणि एजीएस एंटरटेन्टमेंटकडून जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या रॉमकॉम सिनेमातून बॉलीवूडमधून एक नवीन जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सिनेरसिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. लव्हयापा हा मॉडर्न लव्हस्टोरी आहे. हा सिनेमा २०२२ साली रिलीज झालेल्या हिट लव्ह टुडे या सिनेमाचा रिमेक असल्याचेही म्हटलं जात आहे.