For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अबब! ६२५०० चौकड्यांचे जम्बो शब्दकोडे ? 'शब्दकोडेकार' प्रसन्न कांबळींची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद

11:09 AM Jun 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
अबब  ६२५०० चौकड्यांचे जम्बो शब्दकोडे    शब्दकोडेकार  प्रसन्न कांबळींची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद
jumbo crossword Shabdkodekar Prasanna Kambli
Advertisement

रत्नागिरी पतिनिधी

येथील शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी 250 बाय 250 म्हणजे तब्बल 62500 चौकोनांचे हे शब्दकोडे सुमारे चार वर्षे अथक मेहनत घेत पूर्ण केले आहे. त्यांया या कामगिरी दखल इंडिया बुकने घेतली आहे. या कोड्यामध्ये 13886 आडवे शब्द आणि 13845 उभे शब्द आहेत.

Advertisement

सोमवारी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या प्रवासाविषयी माहिती दिली. एकूण दहा हजार शब्दकोडी पूर्ण झाली आहेत. 250 चौकोन असलेले अतिभव्य शब्दकोडे तयार करताना काहीवेळा व्यत्यय आल्यामुळे हे कोडे विहीत मुदतीत पूर्ण झाले नाही, असे ते म्हणाले.

आता एशिया बुकसाठी कांबळों जोरदार पयत्न सुरू
कांबळी यांची कोडी दोनवेळा इंडिया बुकमध्ये नोंद झाली आहेत, हा एक विक्रम म्हणावा लागेल. लिम्का बुकमध्ये एकदा व इंडिया बुकमध्ये दोनदा असा तीनवेळा त्यांनी राष्ट्रीय विक्रम केला आहे. आता एशिया बुकसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.