For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुसळधार पावसाचा जुलै महिना

12:31 PM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुसळधार पावसाचा जुलै महिना
Advertisement

पाच ठिकाणी पावसाने गाठले अर्धशतक: येत्या पाच दिवसांसाठी यलो अलर्ट

Advertisement

पणजी : जुलैमधील मुसळधार पावसाचा अनुभव सध्या गोमंतकीय घेत असून पुढील पाच दिवसांमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा देत हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केले आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात सरासरी 3 इंच पाऊस पडल्याने यंदाच्या मोसमातील एकूण पाऊस आता सरासरी 45 इंच झाला आहे. मात्र सांखळी, वाळपई, काणकोण व सांगे येथे आतापर्यंत 50 इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असून मडगाव पेंद्र आज शनिवारी इंचाची पन्नाशी पूर्ण करणार आहे.

राज्यात यंदा जोरदार पाऊस कोसळलेला आहे. शुक्रवारी सकाळी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता, तो दिवसभरासाठीच होता. या दरम्यान गोव्यात सर्वत्र जोरात पाऊस पडून गेला. पणजीत मात्र हलक्या स्वऊपात पाऊस झाला. पुढील 24 तासांमध्ये गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही हवामान खात्याने जारी केला. यंदाच्यावर्षी आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला आहे. आतापर्यंत 45 इंचापेक्षाही जास्त पाऊस सरासरी पडलेला असून वार्षिक सरासरी पेक्षा तो आता अधिक झालेला आहे. आजपासून आषाढ महिना सुऊ होत आहे. आषाढात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असतो. त्यामुळे पुढील 20 दिवस पाऊस आक्रमकपणे पडत राहणार आहे.

Advertisement

चार ठिकाणी पावसाचे अर्धशतक पार

यंदाच्या मोसमात सांखळी व वाळपईत भरपूर पाऊस झालेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये गोव्यातील सर्वाधिक पावसाची नोंद वाळपईत झाली. सुमारे 5.50 इंच पाऊस वाळपईत झाला. त्यामुळे आता वाळपईत यंदाच्या मौसमात पडलेल्या पावसाची नोंद 56.50 इंच झालेली आहे. मडगावात 8 इंच पावसाची नोंद झालेली असून आज मडगाव इंचाचे अर्धशतक पार करणार आहे.

पावसाने अर्धशतक गाठलेली ठिकाणे

  • वाळपई 56.50 इंच
  • सांखळीत 53.36 इंच
  • काणकोण 50 इंच
  • सांगे 54.27
  • मडगावात  50 इंच

गेल्या 24 तासांतील पाऊस

  • म्हापसा 4 इंच
  • पेडणे  1.50 इंच
  • फोंडा  4 इंच
  • पणजी  2 इंच
  • जुने गोवे  2.5 इंच
  • सांखळी  3 इंच
  • वाळपई  5.5 इंच
  • काणकोण 3 इंच
  • दाबोळी  1 इंच
  • मडगाव  4 इंच
  • मुरगाव  1.5 इंच
  • केपे  3 इंच
  • सांगे  5 इंच
Advertisement
Tags :

.