कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्युबिलंट फूडसचा भारतात व्यवसाय विस्तार

06:43 AM Apr 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली:

Advertisement

डॉमिनो, फ्राइड चिकन ब्रँड पोपेयेज याच्याशिवाय डंकीन आणि हॉंग्स किचनची फ्रँचाइजी असणाऱ्या ज्युबिलंट फुड्सने टायर 1 आणि टायर 2शहरांमध्ये आपल्या स्टोअरची संख्या आगामी काळात वाढवण्याचा निर्धार केला आहे. पुढील तीन वर्षाच्या कालावधीत पिझ्झा निर्मितीत असणाऱ्या डॉमिनोज स्टोअर्सची संख्या 3 हजार पर्यंत वाढवली जाणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतील फ्राईड चिकन ब्रँडच्या पोपेयेज स्टोअर्सची संख्या 250 इतकी नव्याने वाढवली जाणार आहे. ज्युबिलंटस फुड्स लिमिटेडची सध्या भारतामध्ये 2100 डॉमिनोज स्टोअर्स विविध शहरात कार्यरत आहेत.

Advertisement

जागतिक स्तरावर पाहता अमेरिकेतील या कंपनीचा हा भारतातला पिझ्झा स्टोअर्सचा विस्तार हा दुसऱ्या क्रमांकाचा ठरला आहे. पोपेयेजची सध्याला देशात 60 स्टोअर्स असून 50 स्टोअर्स दरवर्षी सुरु करण्याचा मानस कंपनीने बोलून दाखवला आहे. डंकीन व हांग्स किचनची जवळपास 30 स्टोअर्स भारतात कार्यरत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article