जेएसडब्ल्यू-एमजी कार 1.5 टक्क्यांनी महागणार
07:00 AM Jun 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सात महिन्यात दुसऱ्यांदा केली वाढ
Advertisement
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आता वाहन ग्राहकांना एमजी कार खरेदी करण्याचा विचार असेल तर 30 जूनपर्यंत ती खरेदी करा. कारण, जेएसडब्ल्यू-एमजी मोटर इंडियाने 1 जुलै 2025 पासून त्यांच्या कारच्या किमतीत 1.5 टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. ही वाढ कंपनीच्या सर्व मॉडेल्समध्ये वेगवेगळी असेल. कच्च्या मालात आणि ऑपरेशनल कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीने 7 महिन्यांत दुसऱ्यांदा हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, एमजीने 1 जानेवारी 2025 पासून कारच्या किमती 3 टक्के पर्यंत वाढवल्या होत्या. तरीही, एमजीने सांगितले की किंमत वाढवण्याचे कारण कच्चा माल महागल्याचे सांगितले जात आहे.
Advertisement
Advertisement