For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन

06:48 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन
Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

तालुक्यात शनिवारी लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले. सकाळी घरगुती गणेशमूर्ती आणण्यात आल्या. दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती आणल्या. शनिवारी दिवसभर तालुक्यात उत्साहाचे वातावरण दिसून आले. विधिवत पूजा करून गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तालुक्याच्या अनेक गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जल्लोषात गणरायाचा आगमन सोहळा केला. सजविलेल्या ट्रॅक्टर, टेम्पोमधून सार्वजनिक गणेशमूर्ती आणण्यात आल्या. यावेळी गणेशमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह लेझीम, झांज पथक आदी वाद्यांचा गजर करण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

शनिवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच होती. मात्र, पावसाची तमा न बाळगता भक्तांमध्ये उत्साह दिसून आला. भक्त लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करीत होते. दुचाकी, कारगाडी, टेम्पो आदी वाहनांमधून गणेशमूर्ती आणण्यात आल्या. गणेशमूर्ती आणण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची लगबग सुरू होती. गणरायाच्या आगमनाने अवघा तालुका दुमदुमला होता. घरगुती गणेशमूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी दुर्वा, लाल फुले वाहण्यात येऊन मोदक अथवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याचा आला.घरगुती गणेशमूर्ती आगमनासाठी घरातील सदस्यांमध्ये उत्साह दिसून आला.

Advertisement

दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती आणण्यात आल्या. सजविलेल्या टेम्पो व ट्रॅक्टरमधून बाप्पाचा आगमन सोहळा सुरू होता. यावेळी फटाक्यांची  आतषबाजी करण्यात येत होती.खानापूर रोड पिरनवाडी येथील लोहार शाळेतून गणेशमूर्ती आणण्यात येत होत्या. तसेच मच्छे, बेळगुंदी, कर्ले आदी गावांतील शाळांमध्येही मूर्तिकारांनी सुंदर मूर्ती बनविलेल्या आहेत. गणरायाच्या आगमन मिरवणुकीसाठी बहुतांशी गावांमध्ये डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांच्या गजर करण्यात आला.

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पंधरा दिवसांपासून मंडप सजावटीचे काम सुरू केले होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत  मंडप सजावट करण्यात कार्यकर्ते दंग होते. सार्वजनिक गणेशमूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती गावागावांमध्ये सुरू होती. महाआरतीनंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त तालुक्याच्या अनेक गावातील मंडळांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अकरा दिवस विविध कार्यक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आगमन सोहळ्याने भक्तांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.तालुक्याच्या बेळगुंदी, बहाद्दरवाडी आदी गावांमध्ये एक गाव एक गणपतीची परंपरा आहे.गावागावांमध्ये महाआरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. गणेशोत्सवानिमित्त नागरिकांमध्ये एकात्मतेचे दर्शन घडले. बस्तवाड, हलगा परिसरात घरगुती गणेशमूर्ती सकाळी आणण्यात आल्या.

किणये, कर्ले, नावगे, बामणवाडी, बाळगमट्टी, राकेसकोप, सोनोली, येळेबैल, वाघवडे, झाडशहापूर आदी भागात श्रीमूर्तीचे मोठ्या उत्साहात आगमन झाले.

पिरनवाडीतील नवक्रांती गणेशोत्सव मंडळाचे यंदा 75 वे वर्ष आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच श्रीमूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आगमन सोहळ्याला सुऊवात करण्यात आली होती. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यात आला. पिरनवाडीतील पाटील गल्ली व रयत गल्लीतील नागरिकांनी नवक्रांती युवक मंडळाची स्थापना केली. गेल्या 75 वर्षांपूर्वी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. मनोहर आपटेकर होते. त्यानंतर नागेश शहापूरकर यांनी काही वर्षे मंडळाचा पदभार स्वीकारला होता. सध्या या मंडळामध्ये तऊणांची संख्या अधिक आहे. शनिवारी मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. 75 व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.