खासबाग-वडगावात दौडचे जल्लोषी स्वागत
बालक, महिलांचा अमाप उत्साह : शिवरायांचा जयघोष : दौड मार्गावर धारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत
बेळगाव : शहरात घटस्थापनेपासून सुरू झालेली दुर्गामाता दौड मंगळवारी खासबाग, वडगाव परिसरात उत्साहात पार पडली. दौड मार्गावर धारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी पेपर फटाके, पुष्पवृष्टी आणि ध्वज पूजन करून स्वागत करण्यात आले. दिवसेंदिवस दौडमध्ये सहभागी होणाऱ्या शिवभक्तांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे दौडमधील उत्साह शिगेला पोहोचू लागला आहे. सहाव्या दिवसाच्या दौड मार्गावर भगवे झेंडे, भगव्या पताका, भगवे फुगे, भगवे फेटे यामुळे वातावरणात चैतन्यमय झाले होते. त्याबरोबरच शिवाजी महाराज, संभाजी महाराज, माँ साहेब जिजाऊ आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील बालकांनीही साऱ्यांचे लक्ष वेधले.
जागोजागी छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, पुरुषोत्तम प्रभु श्रीराम आणि हनुमंताची मूर्ती ठेऊन दौडीचे स्वागत केले. सहाव्या दिवशीच्या दौडला बसवेश्वर चौक, खासबाग येथून प्रारंभ झाला. येथील दुर्गामाता मंदिरात आरती आणि प्रेरणामंत्र म्हणून दौडला चालना देण्यात आली. प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ धारकरी शंकरदादा भातकांडे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला.
बसवेश्वर सर्कल येथील दुर्गामाता मंदिरापासून दौडला प्रारंभ होऊन भारतनगर पहिला क्रॉस, नाथ पै सर्कल, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगाम्मा मंदिर रोड, भारतनगर पाचवा क्रॉस, चौथा क्रॉस, रयत गल्ली, ढोरवाडा, सपार गल्ली, दत्त गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मेन रोड, बाजार गल्ली, मारुती मंदिर, तेग्गीन गल्ली, जुने बेळगाव रोड, गणेशपेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर, लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नूरकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प क्रॉस नं. 3, हरिजनवाडा, हरिमंदिर, विठ्ठल मंदिर, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, पाटील गल्ली, संभाजीनगर, पाटील गल्ली येथून मंगाई मंदिर येथे सांगता करण्यात आली. मंगाई मंदिरात मंगाई देवीची आरती आणि ध्येयमंत्राने मंगळवारच्या दौडची सांगता झाली. यावेळी डॉ. दीपक करंजीकर, उद्योगपती रोहित देशपांडे यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.
मंगाई देवीच्या परिसरात दौडची सांगता होत असताना डॉ. दीपक करंजीकर म्हणाले, दौडमधील प्रेरणा आणि शिवरायांचे विचार घेऊन कार्यरत राहणार आहोत. त्यामुळे दौडमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. शिवरायांकडे दूरदृष्टीपणा होता. त्यांचा इतिहास जगण्याला वेगळी प्रेरणा देतो. त्या विचारांचे पाईक होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वागत
दुर्गामाता दौड कारभार गल्ली, वडगाव येथे येताच महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी दौडीच्या ध्वजाचे पूजन करून उत्साहात स्वागत केले. एरवी सफाई कामात मग्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पहाटे निघालेल्या दुर्गामाता दौडचे उत्साहात स्वागत केले.
उद्याचा दौडचा मार्ग .....
धर्मवीर संभाजी चौक येथून प्रारंभ होणार आहे. किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, अशोक चौक, बसवाण गल्ली, लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरूड गल्ली, भातकांडे गल्ली, बुरूड गल्ली, मेणसी गल्ली, आझाद गल्ली, तेग्गीन गल्ली, भोई गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, तेग्गीन गल्ली, कामत गल्ली, पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कोर्ट कॉर्नर, सरदार्स ग्राऊंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदे खुट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक येथील मारुती मंदिरमध्ये सांगता होणार आहे.