सर्वात मोठ्या दागिन्यांच्या सेलची जोयआलुक्कासची घोषणा
दागिन्यांच्या सर्व प्रकारांसाठी घडणावळीवर फ्लॅट 50 टक्के सवलत : ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन
बेंगळूर : भारताचा आवडता ज्वेलर जोयआलुक्कास यांनी त्यांच्या सर्वात जास्त प्रतीक्षा केल्या जाणाऱ्या वर्षातील सर्वात मोठा दागिन्यांचा सेल या शॉपिंग इव्हेंटची घोषणा केली आहे. 13 जुलैपर्यंतच्या मर्यादित कालावधीसाठी ग्राहकांना सोने, कट आणि अनकट हिरे, प्लॅटीनम, चांदी आणि मौल्यवान रत्नांच्या दागिन्यांच्या आकर्षक श्रेणीसाठी घडणावळीवर अपवादात्मक सवलत मिळणार आहे. एक लाखाहून जास्त वैशिष्ट्यापूर्ण डिझाईन्सच्या क्युरेट केलेल्या पोर्टफोलिओमध्ये जोयआलुक्कासने पारंपरिक आकर्षकतेचा जागतिक प्रभावाशी संगम घडवून आणला आहे. यात अचूकतेने आणि कलात्मकतेने तयार केलेल्या भारतीय क्लासिक्सपासून ते आधुनिक इटालियन, टर्किश आणि एथ्नोमॉडर्न स्टाईल्सच्या दागिन्यांचा समावेश आहे.
दागिन्यांचा सेल 13 जुलैपर्यंत
वर्षातील सर्वात मोठा दागिन्यांचा सेल 13 जुलैपर्यंत जोयआलुक्कासच्या सर्व शोरूम्समध्ये वैध आहे. या खास ऑफर व्यतिरिक्त ग्राहकांना जोयआलुक्कासमध्ये केलेल्या प्रत्येक खरेदीवर आयुष्यभर मोफत देखभाल, एक वर्षाचा मोफत विमा आणि परत खरेदी करण्याची हमीसुद्धा मिळते. या खास ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे.
प्रत्येक ग्राहकाला दागिन्यांच्या खरेदीचा आनंद देणे आमचे ध्येय
जोयआलुक्कास ग्रुपचे चेअरमन डॉ. जोय आलुक्कास या सेलची घोषणा करताना म्हणाले, ‘आमचे ध्येय प्रत्येक ग्राहकाला दागिन्यांच्या खरेदीचा एक आनंददायक अनुभव देणे, हेच आहे. वर्षातील सर्वात मोठ्या दागिन्यांच्या सेलद्वारे आमच्या ग्राहकांना अतुलनीय किंमत, गुणवत्ता आणि डिझाईनमधील वैविध्य देऊ करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या शोरूम्समध्ये उपलब्ध असलेल्या या खास ऑफरचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्व दागिनेप्रेमींना आमंत्रित करत आहोत.