जिल्हास्तरीय शांतता समितीत पत्रकार तेजस देसाई व ॲड .सोनू गवस यांची निवड
दोडामार्ग - वार्ताहर
दोडामार्ग तालुक्यातील प्रतिथयश वकील सोनू गवस व दै. तरुण भारत संवादचे तालुका प्रतिनिधी तेजस देसाई या दोहोंची जिल्हास्तरीय शांतता समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा व शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय शांतता समिती गठित करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २०२४ -२५ करिता अस्थायी सदस्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्रही अप्पर पोलीस अधीक्षक कृशिकेश रावले यांनी दिले आहे.
पत्रकार तेजस देसाई हे गेली १७ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आहेत. तेजस देसाई हे केर गावचे सुपुत्र आहेत. श्री. देसाई यांना याआधी तालुका व जिल्हास्तरावरील अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. शिवाय तंटामुक्त मोहीमेमध्ये उत्कृष्ठ लेखनाचा कोकण स्तरीय पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच तालुक्यात वेगवेगळया स्वयंसेवी संस्थावर ते काम करत असतात. शांतता प्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ते तालुक्यात ओळखले जातात. तर ॲड. सोनू गवस हे पिकुळे गावचे सुपुत्र आहेत. तेही सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. शिवाय लोककला व माहिती संवर्धनासाठी विशेष कार्य करतात. ते वकील म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.