महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कृत्रिम बुद्धिमत्तेचे पत्रकारितेला आव्हान! : अॅड. वल्लभ गावस देसाई

12:20 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पत्रकारदिनी गुरुदास सावळ, सपना सामंत यांचा सत्कार

Advertisement

पर्वरी : आजच्या पत्रकारितेसमोर कृत्रिम बुद्धिमत्तेने मोठे आव्हान उभे केले आहे. पूर्वसूरींनी घालून दिलेल्या आदर्शांची जपणूक करणे आणि नवीन तंत्रज्ञानाने निर्माण केलेली आव्हाने पेलणे, अशी दुहेरी जबाबदारी वाढली आहे. अशा स्थितीत देखील मराठी पत्रकार अनेक कौतुकास्पद उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा विधिज्ञ अॅड. वल्लभ गावस देसाई यांनी येथे काढले. गोमंतक मराठी अकादमी आयोजित मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ‘पत्रकारिता- काल आज उद्या’ या विषयावर अॅड. देसाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर, गुरुदास सावळ, सपना सामंत, प्रभाकर ढगे आदी उपस्थित होते. मराठी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्राr जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार घालून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मराठी भाषेला योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार म्हणून गुरुदास सावळ तर युवा पत्रकार म्हणून सपना सामंत यांचा यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावळ व सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रभाकर ढगे यांनी केले. उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article