महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोईन अली-बेअरस्टोला वगळले, दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता

06:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 टी-20 आणि 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. टी-20 मालिकेसाठी इंग्लिश संघात 5 नवीन खेळाडूंची निवड केली आहे. याचबरोबर दिग्गज खेळाडू जॉनी बेअरस्टो, मोईन अली व वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनला यांना संघातून वगळले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 11 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान ही क्रिकेट मालिका खेळवली जाईल. या दोन्ही मालिकेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. तथापि, इंग्लंडने आश्चर्यकारक संघ निवडला आहे, ज्यामध्ये जॉनी बेअरस्टो आणि मोईन अलीसह अनेक स्टार्स गायब आहेत. टी-20 आणि वनडे मालिकेसाठी 5 अनकॅप्ड खेळाडूंची निवड करण्यात आली. या 5 खेळाडूंमध्ये फलंदाजी अष्टपैलू जेकब बेथेल, डॅन मौसली, जॉर्डन कॉक्स, गोलंदाज जॉन टर्नर आणि जोश हल यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जोश हल, जेकब बेथेल आणि जॉन टर्नर हे एकदिवसीय संघाचादेखील भाग आहेत.

Advertisement

बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस जॉर्डनला बाहेरचा रस्ता

जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली या खेळाडूंचे वाढते वय आता त्यांच्यासाठी समस्या बनत चालली आहे. वाढत्या वयामुळे हे खेळाडू संघातील स्थान गमावताना दिसत आहेत. बेअरस्टो आणि मोईन अली यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनलाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, या खेळाडूंना संघात स्थान का मिळाले नाही, हे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आले नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघ

जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपली, जॉन टर्नर.

इंग्लंडचा वनडे संघ - जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जोश हल, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, रीस टोपली, जॉन टर्नर.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article