महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांदिवडेतील कट्टर राणे समर्थक ठाकरे सेनेत

03:14 PM Nov 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरुच ;आ वैभव नाईकांनी केले स्वागत

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे.निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजप आणि आता स्वतःच्या उमेदवारीच्या स्वार्थासाठी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ज्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना आधार दिला होता त्यांचा विश्वासघात करत भाजप पक्षातून शिंदे गटात उडी मारली आहे त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज होऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. आज मालवण तालुक्यातील बांदिवडे गावातील कट्टर राणे समर्थक भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आ.वैभव नाईक व शिवसेना नेते गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले आहे.यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले कुडाळ-मालवण मतदारसंघात उमेदवारीसाठी भाजप पक्ष इच्छुक असताना देखील हा मतदार संघ शिंदे गटासाठी सोडला गेल्यामुळे आपण नाराज झालो असून आ.वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन बांदिवडे गावातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते बांदिवडे गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.उमेदवारीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिंदे गटाबाबत असलेली खदखद आता उघड होत आहे.यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी बांदिवडे गावामधील प्रवेशकर्त्यांना दिला आहे.यावेळी बांदिवडे गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते ओमकार मुरकर,शंकर हडकर,संतोष चंद्रकांत मुणगेकर, अनिल चौकेकर,अमोल हळदणकर या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, उदय दुखंडे,समीर हडकर, छोटु पांगे,संजय राणे, आप्पा परब, पप्पू परुळेकर, शाखाप्रमुख बाबुराव गावकरमधुकर परब,आबु घागरे,माजी सरपंच संजय राणे,श्रुती गावकर,नारायण परब, पुष्कपक घाडीगावकर, माजी सरपंच संजय राणे, बाळा सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article