कासार्डे गावचे उबाठाचे शाखाप्रमुख विजय भोगले, नितेश पिसे यांच्या हाती कमळ
12:25 PM Oct 23, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
उबाठा शिवसेनेला धक्का
Advertisement
कणकवलीत / प्रतिनिधी
निवडणुकीच्या तोंडावर कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कासार्डे येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख विजय भोगले, नितेश पिसे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल, आश्वासित केले. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, संतोष कानडे, संतोष पारकर, उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Next Article