कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

6 वर्षांनी पुनरागमन करणार जॉनी डेप

06:24 AM Apr 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डे ड्रिंकरचा फर्स्ट लुक सादर

Advertisement

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन डेप लवकरच थ्रिलरपट डे ड्रिंकरसोबत मोठ्या पडद्यावर पुनरामन करणार आहे. हा चित्रपट त्याचा अनेक वर्षांनंतरचा पहिला बिगबजेट चित्रपट असेल. लायन्सगेट स्टुडिओने चित्रपटातील जॉनी डेपचा पहिला लुक जारी केला असुन तो प्रेक्षकांना पसंत पडत आहे.

Advertisement

या चित्रपटात जॉनीसोबत पेनेलोप क्रूज दिसून येणार आहे. यापूर्वी दोघांनी तीन चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन मार्क वेब करत आहे. तर याची कहाणी जॅच डीन यांनी लिहिली आहे. चित्रपटात मॅडलिन क्लाइन एका नौकेवर (याट) बारटेंडरची भूमिका साकारत असून जो जॉनी डेपकडून साकारण्यात येणाऱ्या एका रहस्यमय पाहुण्याशी मैत्री करतो. ही मैत्री पेनेलोपच्या व्यक्तिरेखेला खटकते आणि यानंतर कहाणीत अनेक नाट्यामय वळणं येत असल्याचे दाखविले जाणार आहे.

हा चित्रपट जॉनी डेपसाठी खास आहे  कारण पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्डसोबत चाललेल्या दीर्घ कायदेशीर वादानंतरचा त्याचा हा पहिला चित्रपट असेल. एम्बरने त्याच्यावर घरगुती हिंसेचे आरोप केले होते. 2018 मध्ये ब्रिटनच्या एका न्यायालयाने एम्बरच्या बाजूने निर्णय दिला होता, परंतु 2022 मध्ये अमेरिकेत जॉनीने एम्बर विरोधात मानहानीचा खटला जिंकला होता.

जॉनी डेपने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात 1980 च्या दशकात केली होती. त्याने 21 जम्प स्ट्रीट नावाच्या टीव्ही शोमधून लोकप्रियता मिळविली, परंतु त्याचा पहिला गाजलेला चित्रपट एडवर्ड सिसॉरहँड्स होता, यातील त्याच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले होते. यानंतर त्याने अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या होता, ज्यात पायरेट्स ऑफ कॅरेबियन चित्रपटांमधील कॅप्टन जॅक स्पॅरो ही भूमिका सामील आहे. डेपने चार्ली अँड द चॉकलेट फॅक्ट्री, अलाइस इन वंडरलँड आणि स्विनी टॉड यासारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article